Kolad Pune Road Accident Pudhari
रायगड

Kolad Pune Road Accident: कोलाड-पुणे मार्गावर कंटेनर २५० फूट खोल दरीत कोसळला; दोघे जखमी, ५ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर चालकाची सुटका

कोलाड-पुणे मार्गावरील पहूर फाटा ते वळंजवाडी दरम्यान कंटेनर २५० फूट खोल दरीत कोसळला. अपघातात चालक आणि क्लीनर जखमी झाले. ५ तासांच्या प्रयत्नांनंतर SVRSS रेस्क्यू टीम, कोलाड पोलीस आणि येरुणकर क्रेन सर्व्हिसने चालकाची सुटका केली.

पुढारी वृत्तसेवा

विश्वास निकम

कोलाड: कोलाड-पुणे मार्गावरील पहूर फाटा ते वळंजवाडी गावा दरम्यान बुधवार दि.१६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास एक मालवाहू कंटेनर खोल दरीमध्ये कोसळून अपघात झाला,या अपघातात दोघेजन जखमी झाले असून सुदैवाने कोणतेही जिवीत हानी नाही.कोलाड SVRSS रेस्क्यू टिम, कोलाड पोलीस तसेच येरुणकर क्रेन यांच्या प्रयत्नाला मोठे यश प्राप्त झाले

प्राप्त झालेल्या माहिती नुसार या कंटेनरमध्ये चालक व क्लीनर हे दोघेजन होते. अपघातानंतर क्लीनर गाडीतून बाहेर पडला; त्याला किरकोळ दुखापत झाली.

मात्र, चालक गंभीर अवस्थेत कंटेनरमध्येच अडकून पडला होता. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थितीची पाहणी केली असता कंटेनर तब्बल २५० फूट खोल दरीमध्ये कोसळलेला असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे कंटेनर एका झाडाच्या आधारावर अत्यंत धोकादायक स्थितीत अडकलेला होता. कोणत्याही क्षणी कंटेनर आणखी घसरून सुमारे ५०० फूट खोल दरीमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत चालकाला बाहेर काढण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध आणि जोखमीचे रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आले. कंटेनरला त्याच ठिकाणी सुरक्षितपणे स्थिर करून शक्य तितक्या काळजीपूर्वक चालकापर्यंत पोहोचणे आणि त्याची सुटका करणे हे मोठे आव्हान होते.

परंतु प्रत्येक टप्प्यावर परिस्थितीची तंतोतंत पाहणी, सुरक्षा व्यवस्थेची खात्री आणि आवश्यक तपासणी करून ऑपरेशन पुढे नेण्यात आले. तब्बल ५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर चालकाची सुरक्षितपणे सुटका करण्यात रेस्क्यू टीमला यश आले.

या संपूर्ण ऑपरेशनमध्ये SVRSS रेस्क्यू टीम येरुणकर क्रेन, कोलाड पोलीस यांनी परस्पर समन्वय साधत अत्यंत धोकादायक परिस्थितीत जिवाची पर्वा न करता चालकाचा जिव वाचवून हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT