मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे
मुरुड जंजिरा येथील खोरा बंदर परिसर कोकणातील सर्वात सुंदर ठिकाण आहे.एकदरा डोंगरापलीकडे समुद्राच्या कुशीत वसलेले समोर प्रसिद्ध जंजिरा किल्ला उजव्याबाजूस शिवरायांनी बांधलेले पद्मदुर्ग किल्ला व अगदी समोर दिघी प्रकल्प व डोंगरी गावच्या काळ्या दगडाच्या डोंगराखाली सुंदर पांढऱ्या वाळूत वसलेला खोरा बंदर पर्यटकांना अनेकवर्षांपासूनभुरळ घालतआहे. परंतु या परिसरात खऱ्याअर्थाने विकास झालाच नाही.नवीन जेट्टी प्रवाशांच्या सेवेसाठी हे पहिले पाऊल आहे.
कपारीत वसलेल्या काळकाई आईच्या मंदिराखाली किनारा पर्यटकांना बोटींसाठी अतिशय सुंदर आहे,स्कुबा ड्रायविंगसाठी समुद्राचे पाणी निळेशार व नितळ आहे.खोराबंदर ते राजपुरी समुद्रालगत दगडावरून रस्ता काढला तर जगातील सुंदर सनसेट पॉईंट होऊशकतो.कारण दोन जलदुर्गामधून सूर्यास्त होत असताना त्याचे प्रतिबिंब समुद्राच्या पाण्यात दिसते हे सुंदर रूप फक्त याच किनारी पाहायला मिळते दर रविवारी पर्यटकांची गर्दी वाढत चालली आहे.शाळांच्या सहली मोठ्याप्रमाणत येत असल्याने किल्ल्या जाण्यासाठी बोटी कमी पडतात व पर्यटकांना तासनसात उन्हात उभे राहावे लागत आहे,त्यासाठी पार्कींगमध्ये सावलीसाठी शेड उभररण्याची गरज आहे.
सध्या अस्तित्वात असलेली जुनी जेट्टी हि ओहटीच्या वेळी प्रवासी वाहतूक करणे अडचणीचे होत असल्याने सदरील कामास तातडीने निधी मंजूर करण्यात आला होता.सध्या बांधण्यात येणारी नवीन जेट्टी हि नव्या स्वरूपात बांधण्यात येणार असून सुमारे 150 मीटर पाण्याच्या आत नवीन जेट्टीचे काम केले जाणार असल्याने ओहटीच्या वेळी प्रवास करताना कोणताही त्रास प्रवासी वर्गाला होणार नाही.
जुनी जेट्टीची लांबी कमी असल्याने ओहटीच्या वेळी प्रवासी होड्या अडकून पडत असत हि अडचण लक्षात घेऊन नवीन जेट्टी बांधण्यासाठी तिची लांबी वाढवण्यात आली आहे. खोरा बंदरातून सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना सहज जाता-येता यावे यासाठी हि जेट्टी खूपच उपयुक्त ठरणार आहे.
जंजिरा किल्ल्यावर दरवर्षी राजपुरी व खोरा बंदरातील जेट्टीवरून 7 लाखांपेक्षा जास्त पर्यटक या किल्ल्यास भेट देत असतात.पर्यटकांच्या माध्यमातून प्रत्येक प्रवासी वर्गाच्या मागे ठराविक वेळी कर आकारला जाऊन त्याचे उत्पन्न महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डास मिळत असते.
जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी नवीन जेट्टी व खोरा बंदरातून पर्यटकांना किल्ल्यापर्यंत पोहचवले जाते.या दोन्ही बंदरात तुफान गर्दी सुट्टीच्या हंगामात होत असते. त्यामुळे खोरा बंदरातील नवीन जेट्टी हि वरदायी ठरणार आहे. लांबी व रुंदी जास्त असल्याने या जेट्टीवर शेकडो पर्यटक अगदी सहज चढू व उतरू शकणार आहेत.ओहटीच्या वेळी नवीन जेट्टी खूपच आवश्यक ठरणार असून पर्यटकांचा खोळंबा होणार नाही. सध्या खोरा बंदरातील नवीन जेट्टीचे काम युद्धपातळीवर न थांबता सुरु असल्याने मे अखेर पर्यंतच्या आत हे काम पूर्ण होणार असून असंख्य प्रवासी व पर्यटकांना याचा मोठा लाभ होणार आहे.