झेनिथच्या कामगारांची दसर्‍यालाच दिवाळी pudhari photo
रायगड

Zenith Steel workers payment : झेनिथच्या कामगारांची दसर्‍यालाच दिवाळी

थकीत देणी देण्याचे न्यायालयाचे व्यवस्थापनाला आदेश, जल्लोषात स्वागत

पुढारी वृत्तसेवा

खोपोली ः खोपोलीतील झेनिथ स्टील कामगारांची कामगारांचे थकीत देणी देण्याचे आदेश उच्च्च न्यायालयाने व्यवस्थापनाला दिले आहेत.यामुळे दसर्‍यालाच कामगारांची दिवाळी साजरी होणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे कामगारांनी स्वागत करत जल्लोष साजरा केला.

एकेकाळी सोन्याचे धूर काढणारी खोपोली शहराला वैभव प्राप्त करून देणारी झेनिथ बिर्ला पोलाद उत्पादन करणारी कंपनी 12 डिसेंबर 2013 रोजी बेकायदेशीररित्या मालकाने बंद केली. कायमस्वरूपी कामगारांसह स्टाफ तसेच कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी कामगारांनी अनेकदा आंदोलन करून मालक व व्यवस्थापणाकडे आपल्या न्याय हक्काचे मागणी पत्र देवून चर्चा करीत असताना या मागणीला दाद न देता कामगारांच्या घरादारावर नांगर फिरवण्याचे षड्यंत्र रचल्याने कामगारांनी मुंबई येथील आझाद मैदानावर हिंद कामगार संघटना अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली 3 वर्ष साखळी उपोषण केले.

त्यानंतर न्यायालयीन लढा सुरू ठेवल्याने अखेर 9 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कंपनी व्यवस्थापणे बेकायदेशीर कंपनी बंद केली होती असा निकाल देऊन कामगारांची थकीत देणी देण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे कामगारांच्या लढ्याला यश आले त्यामुळे येथील कामगारांनी झेनिथ प्रवेशद्वारासमोर जमून आंनद व्यक्त केले आहे.

खोपोली शहरात सन-1960-62 च्या दरम्यान बिर्ला समूहाचा झेनिथ स्टील हा पाईप उत्पादन करणारा कारखाना उभारला गेला.यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला होता. बेकायदेशीर टाळेबंदी केली तेव्हापासूनचा सर्व पगार मिळावा, सेवानिवृत्त झालेले कामगार व स्टाफ कामगारांसह कंत्राटी कामगारांची कायद्याने मिळणारी देणी द्यावीत आशा मागण्या केल्या होत्या. मात्र यात कोणताही तोडगा निघाला नव्हता.

त्यामुळे येथील कामगारांनी हिंद किसान कामगार संघटनेच्या माध्यमातून न्यायालयीन लढा सुरूच ठेवल्याने अखेर नऊ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निकाल लागला. बुधवारी कामगारांनी एकत्र येत जल्लोष करीत फटाके वाजविले व पेढे भरवून आंनद व्यक्त केला आहे.

झेनिथ बिर्ला कारखान्यात जवळपास 350 हुन अधिक कायमस्वरूपी कामगार व कंत्राटी कामगार तसेच कर्मचारी असे हजार ते बाराशे कामगार व्यवस्थापनाने आडमुठे धोरण अवलंबून कंपनी बंद केल्याने या कामगारांच्या कुटुंबावर बेकारीची कुर्‍हाड कोसळली मात्र धीर न सोडता या विरोधात उपोषण धरणे आंदोलन सुरू ठेवले. हिंद किसान कामगार संघटनेचे कैलासभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन लढाही सुरू ठेवल्याने न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय देऊन हिशोब देण्याचे आदेश कंपनी व्यवस्थापनाला काढले आहेत
राजेंद्र मोहिते कामगार प्रतिनिधी झेनिथ बिर्ला कंपनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT