खोपोली ः नगर परिषदेचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे.31 पैकी सोळा जागा महिलासांठी तर फक्त पंधराच जागा पुरूषांसाठी आरक्षित करण्यात आल्याने इच्छुकांच्या दांड्या उडल्या आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षविरहीत अंतर्गत पँनल करून निवडणूक लढण्याची सेटींग केली होती. महिला ओबीसी आणि एक सर्वसाधारण आरक्षण पडल्यामुळे नेत्यांची चांगलीच गोची झाला असून आता निवडणूक आमने सामने लढावे लागणार आहे.तर एकच प्रभागात सतत एकच आरक्षण पडल्यामुळे हरकती घेण्यात येणार आहेत.
जवळपास चार वर्षांनंतर खोपोली नगरपालिकेची निवडणूक होणार आहे.त्याकरीता प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरु आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण जाहीर झाले आहे. सर्वचे नगरसेवक उमेदवार आरक्षण सोडत जाहीर होण्याची प्रतीक्षा संपली आणि बुधवार दि.8 आँक्टोंबर रोजी आरक्षण सोडत निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन वाघमारे होते. मुख्याधिकारी,प्रशासक डॉ.पंकज पाटील उपस्थित होते. पालिकेचे उपमुख्याधिकारी रणजित पवार,विश्वास पाटील, गाढवे यांनी सोडतीचे काम पाहिले. आहे प्रभाग क्र.1,3 ,5 याच प्रभागात राखीव पडत असल्याने दुस़र्याही प्रभागात लोकसंख्या जास्त असतानाही आरक्षण का पडत नाही.यामुळे अन्याय होत आहे.
अनेक दिग्गजांचे पत्ते कट
शिंदे गटाचे नेते माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांच्या प्रभागात ओबीसी आणि सर्वसाधारण महिला पडल्यामुळे त्यांचा पत्ता कट तर प्रभाग क्रंमाक 12 मध्ये शेकापक्षाचे अबूबकर जळगावकर आणि शिंदे गटाचे बेबीशेठ सँम्युअल अंतर्गत युती करून पँनल तयार करून लढणार असल्याची चर्चा होती.मात्र ओबीसी आणि सर्वसाधारण महिला पडल्यामुळे जळगावकर आणि सँम्युअल यांच्या थेट लढत होण्याचे चिन्ह आहे.
प्रभाग क्र.9 मध्येही अनुचित जमात आणि सर्वासाधरण महिला आरक्षण पडल्यामुळे नासीर पाटील आणि कमालउद्दीन पाटील यांनाही मोठा धक्का बसला असून महिला उमेदवार उभी करावा लागणार आहे.नगरसेवकांची आरक्षण सोडतीत अनेक इच्छुक उमेदवारांच्या प्रभात आरक्षण पडल्यामुळे दुसरया प्रभागात निवडूक लढणार का? सर्वच पक्षांना आता प्रभागांमध्येही इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू करावी लागणार आहे.
असे आहे प्रभाग सोडत आरक्षण
1 प्रभाग क्र. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला )सर्वसाधारण,प्रभाग 2 अनुसूचित जाती ,सर्वसाधारण (महिला),प्रभाग 3 ,अनुसूचित जाती (महिला) सर्वसाधारण,प्रभाग 4 -नागरिकांचा मागास प्रवर्ग,सर्वसाधारण (महिला),प्रभाग 5 -अनुसूचित जाती ( महिला),सर्व साधारण,प्रभाग 6-सर्वसाधारण ( महिला ) सर्वसाधारण,प्रभाग 7 -नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ) सर्वसाधारण,प्रभाग 8-नागरिकांचा मागास प्रवर्ग,सर्वसाधारण ( महिला ),प्रभाग 9- अनुसूचित जमाती,सर्वसाधारण ( महिला ),प्रभाग 10 - नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ),सर्वसाधारण ( महिला ),सर्वसाधारण,प्रभाग 11,सर्वसाधारण ( महिला ),सर्वसाधारण,प्रभाग - 12 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,सर्वसाधारण प्रभाग- 13 -नागरिकांचा मागास प्रवर्ग ,सर्वसाधारण महिला,प्रभाग 14 - नागरिकांचा मागास प्रवर्ग,सर्वसाधारण ( महिला ),प्रभाग 15 सर्वसाधारण (महिला),सर्वसाधारण असे नागरिकांच्या मागास प्रवर्ग चार,अनुसुचित जाती दोन,सर्वसाधारण दहा असे एकूण 16 जागांसाठी महिला आरक्षण तर नागरिकांच्या मागास प्रवर्ग चार,अनुसुचित जाती एक,सर्वसाधारण नऊ,अनुसुचित जमातीसाठी एक असे एकूण 15 जागांसाठी पुरूष आरक्षण जाहिर झाले आहे.