Khopoli Municipal Council Controversy Pudhari
रायगड

Khopoli Municipal Council Controversy: खोपोली पालिका सभेत मांडलेले विषय इतिवृत्तातून गायब; भाजप नगरसेविका सोनिया शेख आक्रमक

नगरपालिकेला विचारला जाब

पुढारी वृत्तसेवा

खोपोली: खोपोली नगरपालिकेत नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रकार समोर आला असून,याबाबतभाजपच्या नगरसेविका सोनिया मोसीन शेख आक्रमक झालेल्या आहेत.

पालिका सभेत प्रभागातील मांडलेले विषय इतिवृतांतून गायब करण्यात येत असल्याचा आरोप करत शेख यांनी नगराध्यक्षांसह ,मुख्याधिकारी आणि नगरविकास खात्याला नोटीस पाठवून खुलासा करण्याची मागणी केलेली आहे. सोशल मीडिया मार्फत हा विषय जनतेसमोर आणण्याचे धाडस दाखविले आहे.

नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये प्रभाग आणि जनतेच्या विकासासाठी नगरसेवकांनी मांडलेले प्रश्न अधिकृत इतिवृत्तात जाणीवपूर्वक दडपले जात असल्याचा, तसेच सभागृहात लोकप्रतिनिधींना पुरेसा वेळ बोलू न देता मधेच थांबवले जात असल्याचा गंभीर आरोप प्रभाग क्रमांक 11 च्या नगरसेविका सानिया मोहसीन शेख यांनी केला आहे.

पालिकेच्या कारभारात संपूर्ण पारदर्शकता यावी आणि सर्व नगरसेवकांना आपले प्रश्न मांडण्याची समान संधी मिळावी, यासाठी यापुढील सर्व सभांचे थेट प्रक्षेपण करावे आणि प्रत्येक नगरसेवकाला बोलण्यासाठी निश्चित वेळ ठरवून द्यावी, अशी कायदेशीर नोटीस त्यांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना सादर केली आहे.

प्रशासनावरील दबाव वाढला

विषयाचे गांभीर्य ओळखून नगरसेविका सानिया मोसीन शेख यांनी या पत्राच्या प्रती माहिती व योग्य कायदेशीर कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग, संचालक नगरविकास संचालनालय, मुंबई आणि उपविभागीय अधिकारी कर्जत-खालापूर यांनाही पाठवल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक प्रशासनावर हा ठराव अजेंड्यावर घेण्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला आहे.

सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण करा

नगरपरिषदेच्या आगामी सर्व सभांचे पालिकेच्या अधिकृत युट्यूब चॅनेल किंवा फेसबुक पेजवरून ‌‘थेट प्रक्षेपणं करण्यात यावे किंवा संपूर्ण सभेची अधिकृत व्हिडिओग्राफी करून ती 24 तासांच्या आत पालिकेच्या संकेतस्थळावर जनतेसाठी उपलब्ध करावी, अशी आग्रही मागणी सानिया शेख यांनी या ठरावाद्वारे केली आहे. त्याचसोबत सभागृहात प्रत्येक नगरसेवकाला बोलण्यासाठी किमान 5 ते 7 मिनिटांची वेळ निश्चित करून द्यावी, जेणेकरून सभेचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने चालेल,असे त्यांनी सुचित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT