खोपोली ः प्रशांत गोपाळे
पेण-खोपोली मार्गावरील एचपी इंटरनॅशनल या केमिकल कंपनीमध्ये रात्री भीषण आग लागली असून आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहेत. आगीच्या भडकलेल्या ज्वाला दुरवरुन दिसत होत्या.आगीबरोबरच स्फोटांचे आवाजही येतअसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ते जीव वाचविण्यासाठीअन्यत्र जात आहेत.दरम्यान,आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.
आगीचे वृत्त कळताच पेण नगरपालिका,खालापूर येथील विविध कंपन्यांचे अग्निशमन बंब आणि जवान घटनास्थळी दाखल झालेलेआहेत.आगीची व्याप्ती मोठी असल्याने तसेच धुरामुळे आग विझविण्यातअनेक अडथळे येत आहेत.घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.शिवाय या परिसरातील वाहतूकही थांबविण्यातआली आहे.
खालापूर तालुक्यातील नारंगी व डोणवत गावाजवळच्या एचपी इंटरनॅशनल कंपनीत सायंकाळच्या दरम्यान एसीमध्येशॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. ज्वालाग्राही पदार्थ असल्याने आगीचा भडका वाढतच गेल्याने कंपनीतील उत्पादन प्रक्रिया करणारा विभाग पूणपणे आगीत खाक झाला आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील कारखान्यांचे अग्निशमक दलाची वाहने मागविण्यात आली असून रात्री उशिरा पर्यत अग्निशमक दलाचे जवानांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. मात्र पुन्हा आगीचा भडका वाढतच गेल्याने दुसऱ्या विभागाला ही आग लागली. आगीतील धुरामुळे अनेक कामगारांचा श्वास कोंडल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले आहे.
या विभागात ज्वालाग्राही रसायने असल्याने कामगार ही सैरावैरा झाले मात्र आगीचा भडका वाढतच गेल्याने ही आग विझविण्यासाठी कामगारांची धावपळ सुरू झाली . जवळपास 13 अग्निशामक वाहनांना पाचारण करण्यात आले आहे. अग्निशमक दलाचे जवान अपघातग्रस्त टीम यासह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यासाठी सरसावले होते. या आगीत एक उत्पादन करणारा विभाग जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड,पोलीस निरीक्षक सचिन पवार यासह अन्य अधिकारी घटना स्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फोमचा वापर करण्यात येत आहे.