उन्हाळी सुट्टीत काशीद, मुरूड बीच पर्यटकांनी फुलले pudhari photo
रायगड

Murud summer vacation tourism : उन्हाळी सुट्टीत काशीद, मुरूड बीच पर्यटकांनी फुलले

मुरुडच्या सुक्या मासळीला मोठी मागणी; ताजे मासे खाण्यासाठी मुरुडकडे धाव

पुढारी वृत्तसेवा

मुरूड जंजिरा ःसुधीर नाझरे

मे महिन्याच्या सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी मुरूड तालुक्यातील काशीद, मुरूड बीचवर पर्यटकांची मोठी मांदियाळी झाल्याचे दिसत आहे.

अतिशय गरमा वाढलाअसल्यामुळेवातानुकूलित रूम घेऊन समुद्राच्या थंडगार लाटांमध्ये कूल होण्यासाठी हजारो पर्यटक मुरुडकडे आलेत,दुसरे कारण म्हणजे मुरुडची ताजी मासळी व सुकी मासळी खरेदी करण्यासाठी मुंबई-पुणे व महाराष्ट्रातून पर्यटक मुरुडला येतात,मुरुड सारखी ताजी व सुकी मासळी पूर्ण कोकणात मिळत नाही.दिवाळी पासून कोळी बांधव सोडे,पापलेट,सुरमई,जवळा, पांढरी अंबाडी,सुकवण्याचा काम सुरु असते.मुरुडची सुकी मासळी खात्रीलायक असल्याने महाराष्ट्रातून खरेदी साठी पर्यटक येतात.

मुरुडला पर्यटकांची पसंती

पर्यटकांच्या वर्दळीने मुरुडशहरपरिसर गजबजला असूनसुमारे 5 हजारपर्यटकआलेआहेत. राजपुरी जेट्टी, खोरा बंदर जेट्टी, दिघी बंदर जेट्टीवर पर्यटकांना जंजिऱ्यात जाण्याची जल प्रवासाची सुविधा असून असंख्य पर्यटक जंजिरा पाहण्यासाठी येताना दिसत आहेत. सध्या हवामान उष्ण असल्याने पर्यटनाला अनुकूल नाही तरीही पर्यटक काशीद, नांदगाव, बारशिव समुद्रकिनाऱ्यावर येणारे विविध भागांतील पर्यटक जंजिरा पाहण्यासाठी हमखास येतात असे दिसून आले.

मुरुड समुद्रकिनारी नुकतेच सुरु झालेले पार्किंगमुळे पर्यटकांची उत्तम सोया झाली आहे.पर्यटक हॉटेलमधून पार्किंगमध्ये येतात 2 पायऱ्या उतरल्यावर समुद्राच्या लाटांचा आनंद घेतात.किनारा सुशोभीकरांचा परिणाम पर्यटक वाढीवर नकीच झाला आहे. पर्यटकांनी 2 दिवस राहावे. यासाठी पालिकेने पद्मदुर्ग किल्ल्यात जलवाहतूक सुरु करणे गरजेचे आहे,मुरुडच्या साईड सिन पाहण्यासाठी पालिकेची गाडी असली पाहिजे,दोन्ही किल्ले,कुंद्यामांदाड लेणी,दत्त मंदिर,गारंबी हि स्थळे पाहण्यासाठी नियोजन होणे गरजेचे आहे.

आजच्या किमती

सोडे - 1500

बोंबील सुके - 350 किलो

सुकट - 250 किलो

पापलेट सुरमई सुकी - 600 किलो

अंबाडी - 400 किलो

पर्यटन व्यवसायाला उर्जितावस्था आली आहे. हाजारोंच्या संख्येने पर्यटकांची मांदियाळी समुद्रकिनारी आनंद लुटण्यासाठी उतरली आहे. ठिकठिकाणी निवास व्यवस्था, हॉटेलिंग गजबजून गेले आहेत.दिवाळी सुट्टी असल्याने पर्यटकांची हजेरी स्थिर राहील अशी माहिती महेंद्र पाटील, सूर्यकांत जंगम यांनी दिली. मुरूडमध्ये दरबार रोडवर असणाऱ्या हॉटेल शोअर लाईन या पूर्ण शाकाहारी हॉटेलला अनेक पर्यटकांनी भेट देत शुद्ध शाकाहारी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतलाआहे.
धर्मेश मोरे, हॉटेल मॅनेजर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT