धनराज गोपाळ
पोलादपूर: मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सातत्य कायम राहिले असून सोमवारी दिनांक 8 जून रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटात भोगाव हद्दीत एक भरधाव कार पुढे जाणाऱ्या डंपरच्या खाली घुसल्याने भीषण अपघातात दोन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली या पैकी एकाच उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर महिला गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून एमजीएम हॉस्पिटल कळंबोली पनवेल येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 8 जून रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्ग वर मुंबई कडे भरधाव वेगाने जाणारी कार वरील चालक निकेश बालन याच्या ताब्यातील कार एम एच 05 सी ए 3367 नियंत्रित न झाल्याने थेट पुढे जाणाऱ्या डंपर च्या मागील बाजूस घुसली या अपघातात आई लिसी बालन वय ६३, व मुलगा निकेश बालन रा. कल्याण यांना गंभीर दुखापत झाल्याने दोघांनाही पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात कशेडी पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले होते.
मात्र मुलगा निकेश बालन याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. तर आई लीसी बालन हिला गंभीर दुखापत झाल्याने आधी उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल कळंबोली पनवेल येथे पाठवण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती समजतात कशेडी पोलिस मदत केंद्राची पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, उपनिरीक्षक गिमनेकर,पो. हा. केदार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या अपघाताची माहिती मिळतात काळभैरव रेस्क्यू टीमचे अरुण मोहिते, लक्ष्मण कळंबे यांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रीमच्या साह्याने दोन्ही वाहने रस्त्या च्या बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.
या घटनेची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवलदार रंजेश पवार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.