कर्जतः हेमंत देशमुख/आनंद सकपाळ
सोमवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये कर्जत परिवर्तन विकास आघाडीने जोरदार विजयाची मुसंडी मारत जिल्हा परिषदेच्या सर्वच्यासर्व6 च्यासहाजागांवर आपले उमेदवार निवडून आणले आहेत. तसेच कर्जत पंचायत समितीच्या 12 पैकी 10 जागांवर ही विजय मिळवून कर्जत तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीचाच बोलबाला असल्याचे पुन्हा एकदा या निकालावरून सिद्ध केले आहे.
आ.महेंद्रथोरवेयांनामोठाधक्काबसला. एकाबाजूलागोगावले, दळवींनीविजयाचाचौकार मारलाअसतानाथोरवेमात्रापिछाडीवरपडले. राज्यात जरी महायुती असली तरी कर्जत मतदारसंघात मात्र महायुतीत पहिल्यापासूनच धुसफुस सुरू आहे. याचाच परिणाम असा झाला की न.प.च्या निवडणुकां प्रमाणेच यावेळीही जिल्हा परिषद आणि पं. स.च्या निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर आघाडी करत कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे निर्मिती करून निवडणूक लढवली. तर भाजप आणि शिवसेना शिंदे गट आणि शेकाप यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली.
मात्र तालुक्यातील मतदारांनी परिवर्तन विकास आघाडीला पसंती देत त्यांचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी केले साहजिकच यामुळे महायुतीतील उर्वरित भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणा मधील उमेदवारांना पराभवाची चव चाखावी लागली. परिवर्तन विकास आघाडीने जिल्हा परिषदेच्या सर्व सहा जागांवर विजय मिळवत पंचायत समिती गणांमधील 12 पैकी दहा जागांवर सुद्धा आघाडी मिळून बाजी मारली याउलट शिंदे शिवसेना गट आणि शेकापला पं. स.तील अवघ्या एक एक जागेवर (गण )विजय मिळवत समाधान मानावे लागले. तर भाजपला एकाही जागेवर विजय न मिळवता आल्याने मोठी नामुष्की ओढवून घ्यावी लागली.