नेरळ : आनंद सकपाळ
कर्जत तालुक्यातील आदिवासी बहुल भू-भागात पाणी टंचाईची समस्या आसताना, आशा आदिवासी बहुल भागातील आदिवासी बांधवांची पाण्याची गरज भागवणारी सार्वजनिक असलेली विहीर ही लोखंडी जाळीच्या साह्याने बंद करण्यात आल्याची घटना घडली असता, त्या भागातीत ग्रामस्थांचा संताप व महिलांच्या आक्रमक पावित्र्यामुळे ही बंद करण्यात आलेली विहीर ही आदिवासी बांधवांकरिता पुन्हा खुली करण्यात आली आहे.
विहिरीवर मुंबईतील एका धनिकाने लोखंडी जाळी लावून विहिर बंद केल्याच्या प्रकाराची माहिती ही येथील आदिवासी वाडीमध्ये पसरताच आदिवासी ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याने, त्यामध्येच महिलांनी घेतलेला आक्रमक पवित्रा घेत, खरबाचीवाडी ही सुमारे 45 घरांची आदिवासी वस्ती असल्याने, या जुन्या विहिरीवर गावकऱ्यांच्या गरजेसाठी लागणाऱ्या पाण्याची गरज भागविली जात आहे.
गेल्या काही वर्षांत बोरवेलमुळे पिण्याच्या पाण्याची गरज भागविली जात असली तरी या विहिरीचा वापर कपडे, भांडी धुण्यासाठी तसेच इतर वापरासाठी केला जातो. विहिरीलगतची जमीन विकत घेतलेल्या धनिकाने विहिरीवर लोखंडी जाळी बसवून ती पूर्णपणे बंद केल्याने याबाबत जाब विचारणासाठी गेलेल्या ग्रामस्थ व महिलांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने वातावरण अधिक तापले असता, सदर बाब ही पाथरज ग्रामपंचायत प्रशासन आणि तालुक्यातील आदिवासी संघटनांना निदर्शनास आणून दिली.
संबंधितांनी तातडीने घटनास्थळी येऊन आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ व महिलांनी आक्रमक भूमिका घेत विहिरीवरील लोखंडी जाळी काढून टाकत, पुन्हा विहिर ही आदिवासी बांधवानकरीता खुली करण्यात आली आहे. तर संबंधित धनिकाला पुन्हा अशा प्रकारे विहीर बंद न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी आदिवासी समाज संघटना कर्जत तालुका अध्यक्ष परशुराम दरवडा, ग्रामअधिकारी बी.बी. मोरे, पोलिस पाटील मारुती लोभी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या.
कुटूंबांची पाण्याची गरज
कर्जत तालुक्यातील आदिवासी बहुल भू- भागात सध्या सुरू असलेल्या उन्हाळया पाणी टंचाईच्या समस्यांचे सावट असताना, आशा आदिवासी बहुल भू-भागातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील येणाऱ्या खरबाचीवाडी येथे शासन नोंद असलेली सार्वजनिक विहीर असुन, या वाडीतील महिला ग्रामस्थ या सार्वजनिक विहीरीवरून पाणी भरून आपली व आपल्या कुटूंबाची पाण्याची गरज भागवित आहेत.