नेरळ : आनंद सकपाळ
कर्जत प्रशासकीय इमारतीला लागुन शासनच्या खुल्या असलेल्या जागेत झेरॉक्स व मुद्रांक विक्री परवानाधारकांसाठी उभारण्यात आलेल्या गाळ्यांशेजारी असलेल्या शासनाच्या पर्जन्यमापकाची मोडतोड करून, सदर डबर टाकून अनधिकृत बांधकाम सुरू करण्याची तयारी सुरू केली असल्याचे वास्तव समोर येत असल्याने, मात्र या अनधिकृत बांधकामा संदर्भातील वाद हा निर्माण झाल्याची चर्चा ही नागरिकांमध्ये होत असुन, या धक्कादायक समोर येणाऱ्या प्रकारा बाबत महसुल प्रशासन विभाग निद्र अवस्थेत का? असा प्रश्न मात्र नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
कर्जत नव्या प्रशासकीय इमारतीच्या बाजूला असलेल्या शासनाच्या खुल्या जागेत असलेल्या, शासनाच्या पर्जन्यमापक यंत्र असलेल्या ठिकाणी कोणीतरी मोठ्या प्रमाणात डबर टाकूण अनाधिकृत बांधकाम सुरू करण्याच्या तयारीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.ही जागा कर्जत महसूल मंडळाच्या पर्जन्य मापकासाठी राखीव जागा असल्याचे तेथे लावलेल्या नोटीसमधून स्पष्ट होत आहे. या जागेवर टाकण्यात आलेल्या डबरामुळे त्या जागेत असलेल्या पर्जन्यमापक यंत्राची तोडफोड ही झाल्याचे दिसून येत आहे. प्रकार हा नागरिकांचे नजरेस पडत असल्याने, शासनाच्या पर्जन्यमापक असलेल्या जागेत डबर टाकून अस्तित्वात असलेल्या पर्जन्यमापक यंत्राची तोडफोड झाल्याचे
चित्र सोमर येत असल्याने, व प्रशासकीय इमारत कार्यालयाच्या बाजूला हा अनधिकृत प्रकार सुरू असल्याने, या अनधिकृत बांधकामा संदर्भातील वाद निर्माण झाल्याची चर्चा ही नागरिकांमध्ये होत असल्याने,या पर्जन्यमापक यंत्रावरील लावण्यात आलेल्या नोटीसनुसार या जागेवर कोणतेही बांधकाम केल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे असतानाही या अनाधिकृत बांधकाम सुरू करण्याच्या तयारीचा प्रकार समोर येत असल्याने, प्रशासकीय इमार कार्यालया शेजारीच हा धक्कादायक प्रकार सुरू असल्याने, या धक्कादायक प्रकाराबाबत महसुल प्रशासन विभाग कार्यवाही प्रति निद्र अवस्थेत का? असा प्रश्न मात्र नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
कर्जत तहसील कार्यालयाचे महसूल अधिकारी तथा नायब तहसीलदार सचिन राऊत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या ठिकाणी टाकण्यात आलेल्या डबर व पर्जन्यमापक यंत्रणाच्या तोडमोड संदर्भात विचारणा केली असता, काय आयडिया नाही मी आठवडा भर नव्हतो, त्याच्यामुळे मला काहीच आयडिया नाही. टाकण्यात आलेल्या डबराबाबत मला काहीच माहिती नाही. असे सांगण्यात आल्याने, मात्र प्रशासकीय इमारतीच्या अगदी शेजारीच असा धक्कादायक प्रकार घडत असताना, प्रशासनाला माहिती नसल्याचे सांगण्यात आले असल्याने, आश्चर्य व्यक्त होत असून, या प्रकरणात कर्जत महसूल विभाग आता कोणती कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.