Karjat railway station issues Pudhari
रायगड

Karjat railway station issues: हडपसर-जोधपूर गाडीला कर्जत येथे थांबा मिळावा; कर्जतच्या रेल्वे प्रश्नासाठी मुरलीधर मोहोळ यांना साकडे

कर्जतकरांचा केंद्रीय मंत्री व खासदार यांच्यावर विश्वास राहिला नाही. तरीही कर्जतकर विविध मार्गातून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

नेरळ: मुंबई-पुणे मध्य रेल्वे स्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले कर्जत रेल्वे स्थानक हे अनेक समस्यांनी घेरले आहे. कर्जत रेल्वे स्थानकांतील अनेक समस्यांप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना साकडे घालण्यात आले आहे.

कर्जत रेल्वेच्या समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटना, कर्जतकर नागरिक, वैयक्तिक काहींनी अशी अनेक निवेदन देऊन खुद्द रेल्वे मंत्र्यांची कर्जत रेल्वे स्थानकावर भेट घेतली, मात्र कर्जतच्या समस्या काही सुटत नाही. त्यामुळे कर्जतकरांचा केंद्रीय मंत्री व खासदार यांच्यावर विश्वास राहिला नाही. तरीही कर्जतकर विविध मार्गातून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

कर्जत, खोपोली, नेरळ, मोहापाडा, रसायनी व पेण या भागातील राजस्थानला जाणाऱ्या प्रवाशांनी काही दिवसा अगोदर झेड आर यू सी सी सदस्य नितीन परमार यांची भेट घेऊ न विनंती आणि निवेदन दिले की पुण्याहून सुरू झालेली हडपसर जोधपुर या गाडीला कर्जत येथे थांबा मिळावा. यासाठी प्रयत्न करावते. अशी विनंती केली.

ही गाडी सुरू होण्यासाठी पुण्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रयत्न केले होते. या भागात राहणाऱ्या प्रवाशांची अशी इच्छा होती की, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र देण्यात यावे व या गाडीला कर्जत येथे थांबा मिळावा. यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, या विषयाच्या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची काही दिवस अगोदर झेड आरयूसीसी सदस्य नितीन परमार भेट घेतली. या संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले आहे.

एक्स्प्रेस थांबे पुन्हा सुरू करावेत...

त्या पत्राला अनुसरून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्वरित मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांना पत्र लिहिले आहे व ते पत्र नितीन परमार यांनी जनरल मॅनेजर यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. एक्स्प्रेस थांबे पुन्हा सुरू करावेत. कर्जत रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेअंतर्गत समावेश करावा व कर्जत रेल्वे स्थानकातील कोरोनोनंतर बंद झालेल्या सर्व एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे परत सुरू करावेत, या विषयावर रेल्वे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT