नेरळ : कर्जत तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग व रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत करोडो रूपये निधी खर्च करून तालुक्यातील अनेक रस्त्यांचे दुरुस्ती व नुतनीकरणांची कामे करण्यात आली आहे. मात्र या झालेल्या रस्त्यांच्या कामांचे दर्जाचे प्रमाण मात्र रस्त्यांवरील खड्डयांनी आपले मोठया प्रमाणात प्रस्थापित केलेले अतिक्रमणामुळे या कामांचा निकृष्ट दर्जाचे पितळ उघडे झाल्यामुळे कर्जत तालुक्यात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रशासन व शासनाच्या विरोधात भिकमांगो आंदोलन करून या भिकमांगो अंदोलनातून जमा झालेले पैसे हे मुख्यमंत्री सहायता निधी फंडामध्ये मध्ये ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यात सत्ताधारी असलेले लोकप्रतिनिधी व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून तालुक्यात केलेल्या विकास कामांचा ढोल बडविला जात असतानाच, कर्जत तालुक्याती शहरी व ग्रामीण भागातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांच्या नुतनिकाणांची जी करण्यात आलेल्या कामांच्या दर्जाचा पोलखोल ही दस्तुर खुद्द रस्त्यावरील खड्डयांनी आपले अतिक्रमणाचे साम्राज्य प्रस्थापित करून केली असल्याने, मात्र झालेल्या कामांच्या दर्जाचे पितळ हे नागरिकांसमोर उघडे पडले आहे.
नागरिकांना गणेश उत्सवामध्ये आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन व निसर्जन हे या खड्डयांमधून करण्याची वेळ देखील आली असल्याचा प्रत्यय देखील काही नागरिकांना सहन करावा लागला आहे. तर प्रशासनाकडून जनतेच्या पैशातून रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे झाली व सुरू आहे. मात्र काही दिवसात रस्त्यांवर खड्डयांचे दर्शन हे नागरिकांना होत असल्याने, व त्यांच त्रास ही सहन कारावा लागत असल्याने, 19 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्जत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून नेरळ साई मंदीर, नेरळ बाजार पेठ ते कर्जत शहर असा मार्गावरून प्रशासन व शासनाच्या विरोधात भिकमांगो अंदोलन करण्यात आले आहे.
या भिकमांगो आंदोलनाची सांगता ही कर्जत शहरातील टिळक चौकात करण्यात आली असुन, या भिकमांगो अंदोलनाच्या माध्यमातून जमा झालेले 1240/- रूपये हे मुख्यमंत्री सहायता निधी फंडामध्ये मध्ये ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात आल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी यावेळी जाहीर करत, या आठ ते दहा दिवसात तालुक्यातील सगळे रस्ते हे खड्डे मुक्त केले नाही, तर उग्र पद्धतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील प्रशासकीय अधिकारी शिष्ट मंडळाला दीला आहे.
आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा सचिव अक्षय महाले, तालुकाध्यक्ष यशवंत भवारे, तालुका सचिव प्रदीप पाटील, उप तालुकाध्यक्ष स्वप्निल शेळके, प्रविण राणे, नारायण भोईर, भूषण राणे, सागर भोईर, तालुका प्रसिद्धीप्रमुख अवधुत अत्रे, कर्जत शहर अध्यक्ष राजेश साळुंखे, नेरळ शहर अध्यक्ष सुभाष नाईक, नेरळ महिला शहर अध्यक्ष तेजश्री भोईर, माथेरान शहर अध्यक्ष संतोष कदम यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते हे उपस्थित होते.
मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून खड्डे दुरुस्त करा, नाहीतर खुर्च्छा रिकाम्या करा, जनतेला दिलासा द्या, अन्यथा प्रशासन जागाखाली करा, नागरिकांनो भिक दया भिक दया प्रशासनाला भिक दया अशा जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या आहेत. तर नागरिकांनो भिक दया भिक दया प्रशासनाला भिक दया या मनसेच्या घोषणेची सध्या तालुक्यात नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे.