

मुरुड जंजिरा ः सुधीर नाझरे
मुरुड जंजिरा नगरपरिषद सहीचे क्षेत्र हे 3.63 चौ.कि.मी. चे आहे, मुरुड शहराची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 12226 ऐवढी आहे. नगरपरिषद हदीमध्ये कचरा संकलीत करण्यात येणार्या घरांची संख्या 2809 आहे. शहराला लागून असलेल्या समुद्र किनार्याची एकूण अंदाजे लांबी 3 किमी आहे.
मुरुडला येणारे पर्यटक किल्ला पाहून जाणारे वर्षांला 5 लक्ष आहे व मुरुडचा निसर्ग पाहण्यासाठी व समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी व मुरुडला 2 दिवस राहणारे पर्यटकांची संख्या वर्षाला 1 लाख 25 हजार असल्याने 2809 घरात निर्मण होणार कचरा व 6 लाख पर्यटक फिरताना होणार कचरा उचलण्याची व विल्यवत लावण्याची जबाबदारी मुरुड नगर पालिकेकडे आहे. सद्य कचरा उचलण्याची सुविधा पुरेशी आहे, परंतु पुढील काळात पर्यटकसंख्या वाढणार आहे त्याचा विचार करून अद्यावत नियोजन करण्याची गरज आहे.
सद्य पालिका कचरा उचलण्याचे नियोजन-
कचरा संकलन
नगरपरिषदेच्या एकूण 3 घंटागाडी मार्फत शहरातील सर्व घरामंधील कचरा संकलीत करण्यात येतो तसेच बाजारपेठ येथे सकाळी व रात्री कचरा गोळा करणे व रस्ते सफाई वेगळ्या वाहनाव्दारे करण्यांत येते. मुरूड शहरातील रस्ते सफाई करणे व कचरा उचलणे या करिता प्रत्येक भागात कर्मचारी असूनगोळा केलेला कचरा ट्रॅक्टरव्दारे उचलण्यात येतो. समुद्रकिनारी देखील रोज सफाई करता सफाई कर्मचारी अचूक तेथील कचरा उचलण्याकरीता वेगळे वाहन ठेवण्यात येतो.
कचरा वर्गीकरण
नगरपरिषदेच्या घंटागाडीव्दारे घराघरातील गोळा करण्यात येणारा कचरा हा ओला व सुका या वर्गीकृत स्वरूपात गोळा करण्यात येतो व वर्गीकृत स्वरूपात कचरा देण्यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येते. तसेच कचरा डेपोवर देखील येणान्या कचर्याचे वर्गीकरण करण्यात येते त्यामध्ये पुठ्ठा, बॉटल, काथ, प्लास्टीक पिशव्या, चपला, कापड, पत्रा, लोखंड यांसारख्ये वस्तु वेगवेगळ्या केल्या जातात त्याचप्रमाणे ओला कचरा वेगळा करून त्या कचर्यापासून खत निर्मीती केला जातो.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प
घनकचरा व्यवस्थापनेकरीता नगरपरिषदेची मौजे तेलवडे येथे 82.9 गुड्डे जागा आहे तेथे नगरपरिषदेने कचरा वर्गीकरण खत प्रकल्प करीता शेड बांधली असून त्यामध्ये कचरा वर्गीकरण डेीींळपस चरलहळपश व प्रक्रीया याकरीता श्रेडर, कंपोस्टर, स्किनींग मशीन, बेलींग मशीन यासारख्या मशनरी उपलब्ध आहेत. यामधून निर्माण होणरे खत व कचरा वेगळा करून मिळणारे भंगार यांची विक्री नगरपरिषदेमार्फत करण्यांत येते. परंतु हा प्रकल्प गेली अनेक वर्ष बंद होता.
आता पुन्हा नवयाने योजना आणूं सुरु करण्यात आलेला घनकचरा प्रकल्प पुन्हा बंद झाला आहे. हि योजना फक्त कागदावर आहे, प्रत्यक्ष्य पाहिलेतर फक्त कचर्याचा ढिगारा आहे, कोणतेही खात बनत नाही, त्यापासून पालिकेला 1 पैशाचे उत्पन्न नाही याची करणे शोधणे गरजेचे आहे, शाहसनचे पैसे येतात नाही योजना पूर्ण का होत नाही सुरवात चांगली हते, नंतर आलेल्या मशीन गंजून फुकट गेल्या असे पाहायला मिळते, कुठेतरी नियोजनाची गरज आहे.