Karjat Suicide Debt Case Pudhari
रायगड

Karjat Debt Case: पळसदरी धरणाजवळ आजार व आर्थिक कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचे पाऊल

कर्जत तालुक्यातील धक्कादायक घटना; चिट्ठीत आजार व आर्थिक ताणाचा उल्लेख

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : कर्जत पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या पळसदरी धरण परिसरात एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी 22 मार्च सकाळच्या सुमारास उघडकीस आली. हेमंत शंकर घोंगे असे मृत व्यक्तीचे नाव ती सुधागड तालुक्यातील गोंदाव येथील रहिवासी आहे.

मृत व्यक्तीने लिहून ठेवलेल्या चिट्ठीत कर्जबाजारीपणा आणि पाठीच्या आजाराला कंटाळून हे पाऊल उचलल्याचा उल्लेख आढळून आला आहे. सुधागड तालुक्यातील गोंदाव येथील राहणाऱ्या या व्यक्तीचा मृतदेह पळसदरी धरणाजवळील पडीक व जीर्ण अवस्थेतील धर्मशाळेच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तत्काळ गावच्या पोलीस पाटील विनया खोपकर यांना माहिती दिली.

याबाबत माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक मनिषा लटपटे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता संबंधित व्यक्ती नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत असल्याचे आढळले.

पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून पंचनामा करताना त्याच्या खिशात एक चिट्ठी सापडली. त्या चिट्ठीत कर्जाचा बोजा आणि पाठीच्या आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. हेमंत शंकर घोंगे असे मृत व्यक्तीचे नाव ती सुधागड तालुक्यातील गोंदाव येथील रहिवासी आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT