कर्जत ः कुणबी जातीचा ओबीसी मध्ये समावेश असल्याने कर्जत तालुक्यात खाडाखोड करून कुणबी नोंदी घातल्या जात आहेत.त्या नोंदींना कर्जत तालुका ओबीसी समाज संघटना महासंघ यांनी निवेदनाद्वारे विरोध केला. ओबीसी समाज संघटना महासंघ यांच्या माध्यमातून आज कर्जत तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना निवेदन देवून आक्षेप नोंदवला असून ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढण्यात आलेले जीआर रद्द करावा अशा मागण्या केल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाने हैद्राबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट यांचा आधार घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. कुणबी नोंदी नुसार देण्यात येत असलेल्या आरक्षणाला आमचा विरोध नाही,मात्र सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करणे आणि चुकीच्या पद्धतीने कुणबी नोंदी घालण्याचे प्रकार यांस ओबीसी समाजाचा पूर्ण विरोध आहे.
हा विरोध नोंदवण्यासाठी कर्जत तालुका ओबीसी समाज संघटना महासंघ यांच्या वतीने कर्जत येथे प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.कर्जत तालुका ओबीसी समाज संघटना महासंघ यांच्या वतीने अध्यक्ष तथा कर्जत तालुका आगरी समाज संघटना यांच्या अध्यक्षतेखाली निवेदने देण्यात आली.
त्यावेळी लोहार समाज राज्य अध्यक्ष आण्णासाहेब जोशी,नाभिक समाज कर्जत तालुका अध्यक्ष दिलीप शिंदे,आगरी सेना कर्जत तालुका अध्यक्ष महेश कोळंबे, शंकर भुसारी, केतन पोतदार, भगवान चव्हाण, शेळके,आगरी समाज संघटना पदाधिकारी रामचंद्र खरमरे, सज्जन गवळी,संचालक मिलिंद विरले,अंकुश शेळके, दीपक धुळे,दिलीप शेळके, मोहन शिंगटे, दिनेश कालेकर,रामदास माळी, विपुल हिसाळके, नवनाथ ठोंबरे, दशरथ मुने,नीलेश मुने,धनगर समाज अध्यक्ष संतोष शिंगाडे, दीपक भुसारी, राजेश कराळे,महेश भगत, अभिजित रूठे,बळीराम भालेकर,स्वप्नील जामघरे,आदी सह महिला पदाधिकारी सुगंधा मूने,ज्योती मुने आदी उपस्थित होते.