कर्जत-खोपोली लोकल सेवा ठप्प; प्रवाशांचे हाल  pudhari photo
रायगड

Heavy rain railway disruption : कर्जत-खोपोली लोकल सेवा ठप्प; प्रवाशांचे हाल

डोलवली ते लौजी मध्यवर्ती ठिकाणच्या रुळावरील खडीच गेली वाहून

पुढारी वृत्तसेवा

खोपोली : प्रशांत गोपाळे

मुसळधार पावसामुळे कर्जत - खोपोली मार्गावरील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. डोलवली ते लौजी मध्यवर्ती ठिकाणच्या रुळावरील खडी वाहून गेल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली.

गेल्या दोन - तीन दिवसांपासून राज्यात सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक दिवसांपासून नागरिकांना पावसची प्रतीक्षा होती. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागिरकांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे दिलासा तर मिळाला आहे. पण सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणं, कुठे झाड कोसळणं , कुठे दरड पडणं अशाही घटना सुरूच आहे.

सोमवारी सकाळीही जोरदार पावसाने हजेरी लावली असताना रेल्वे मार्गावरही त्याचा परिणाम झाला असता कर्जत–खोपोली मार्गावरील डोलवली ते लौजी मध्यवर्ती ठिकाणच्या रेल्वेमार्गावरील खडीचा थर वाहून गेला आहे. मात्र सुदैवाने ही बाब सतर्क रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेळेत लक्षात आली. त्यानंतर ती गोष्ट त्यांनी लागलीच निदर्शनास आणून दिली. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT