विक्रम बाबर
पनवेल : कामोठे सेक्टर ३५ मधील नामांकित प्रतीक जेम्स सोसायटीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या धामधुमीत घरफोडीची मोठी घटना उघडकीस आली आहे. एका रहिवाशांच्या घरातून तब्बल २५ तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले असून, या घटनेमुळे सोसायटीच्या निवडणुकीला अक्षरशः चोरीचे गालबोट लागले आहे. या सोन्याच्या दागिन्यांची किंमत अंदाजे २५ लाख रुपये एवढी असल्याचे सांगितले जात आहे.
प्रतीक जेम्स मधील रहिवाशी विलास मस्कर यांच्या घरी ही चोरी झाली आहे, घरातील महिला सदस्यांनी घरातील दागिने परिधान करण्यासाठी दागिने पाहण्यासाठी बेड मध्ये गेल्या नंतर ही घटना घरातील सदस्यांना लक्षात आली, विशेष म्हणजे या कुटुंबांनी हे दागिने, बेड मध्ये ठेवल्याचे सांगितले जात आहे, घरातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्या नंतर, या घटनेची माहिती त्यांनी कामोठे पोलिसांना दिली, कामोठे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेऊन, चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
विशेष म्हणजे चोरट्यांनी केवळ बेड मध्ये ठेवलेल्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला आहे, इतरत्र कपाटात ठेवलेलं दागिने जश्यास तसे असल्याचे संगितले जात आहे, त्यामुळे चोरी ही सोसायटी परिसरातील ओळखीच्या व्यक्तीने केली असावी असा संशय आहे. ज्या कालावधीत ही चोरी झाली त्या कालावधीत सोसायटीच्या निवडणुकीची धामधुम सुरू होती, निवडणुकीच्या प्रचारासाठी सदस्याच्या घरी जाऊन गाठी भेटी चालू होत्या याच कालावधीत ही चोरी झाल्याच्या संशय सोसायटी मधील सदस्यांना आहे.
दोन दिवसांपूर्वीच कुटुंबीयांना घरातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. तत्काळ त्यांनी सोसायटीतील शेजाऱ्यांना कळवून पोलीस ठाण्यात धाव घेतली. घरातील कपाटे व लॉकर सु स्थितीत दिसून आले मात्र बेड मधील सोने चोरफ्याने lpas केले हे सराईत चोरट्यांचे काम असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
प्रतीक जेम्स ही कामोठे परिसरातील एक प्रतिष्ठित सोसायटी मानली जाते. सध्या येथे सोसायटीच्या निवडणुकांचे वारे वाहत असून, प्रचारासाठी उमेदवार व सदस्य घरोघरी भेटीगाठी घेत होते. घराबाहेरील ही वर्दळ पाहून चोरट्यांनी संधी साधली असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे.