पनवेल : महापालिकेतर्फे अनधिकृत नर्सरीवर कारवाई करण्यात आली.  pudhari photo
रायगड

Kamothe encroachment action : कामोठेत अतिक्रमणांवर मनपाची धडक कारवाई

अतिक्रमण विभागातर्फे अनधिकृत नर्सरी, स्टॉलवर हातोडा

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : कामोठे प्रभाग समिती क मार्फत अनधिकृत अतिक्रमण व फेरीवाले यांच्यावर मंगळवारी आणि बुधवारी व्यापक स्वरूपात धडक कारवाई करण्यात आली. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार केलेल्या या कारवाईत विविध ठिकाणांवरील अनधिकृत स्टॉल, नर्सरी, फेरीवाले व हातगाड्यांवर कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले तसेच काही ठिकाणी झोपड्या हटविण्यात आल्या.

महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागांत अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्याच्या सूचना उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिल्या असून त्यानुसार कामोठे सेक्टर 19 मधील मारुती स्वीट व चेतक स्वीट परिसरातील अनधिकृत स्टॉलवर कारवाई करून सिलिंडर, शेगडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच सेक्टर 7 येथील एमएनआर स्कूल चौकात अनधिकृत फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. कामोठे पोलीस स्टेशनसमोर फेरीवाल्यांवरही कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.

याचबरोबर सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी डॉ. रूपाली माने व प्रभाग अधीक्षक दशरथ भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सेक्टर 19, 25, अक्षर बिल्डिंग परिसर, खान्देश्वर स्टेशन, सेक्टर 21 व सेक्टर 34 येथे अनधिकृत व विनापरवाना नर्सरींवर कारवाई करून संबंधित झोपड्या तोडण्यात आल्या.

तसेच खान्देश्वर स्टेशन परिसरात अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. सेक्टर 21 येथे दोन नर्सरींसह भंगार व सायकल विक्रेत्यांच्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. सेक्टर 34 येथे अनधिकृत हातगाडी हटविण्यात आली. तसेच नीलकंठ स्वीट परिसरात अनधिकृत नारळ विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली.

अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर महापालिकेने तोडक कारवाईचा बडगा उचलला असून यापुढेही अनधिकृत व्यवसायधारकांवर अशाच प्रकारची कारवाई सुरू राहील, असे महापालिकेतर्फे सूचित करण्यात आले आहे.

नवीन पनवेलमध्येही दणका

  • प्रभाग समिती ‌‘ड‌’ मार्फत 21 एप्रिल रोजी नविन पनवेल परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली.या कारवाईत सेक्टर 3 येथील अनधिकृत भाजी व फळ विक्रेत्यांकडून माल जप्त करण्यात आला. तसेच सेक्टर 2 व शिवा कॉम्प्लेक्स परिसरातील अनधिकृत विक्री करणाऱ्या चिकन विक्रेत्यांचे साहित्यह जप्त करण्यात आले. याशिवाय ब्रिजवासी बिकानेर स्वीट येथील सिलेंडर व काउंटर जप्त करून फुटपाथवरील अनधिकृत फळ विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. विचुंबे रोड येथे बसलेल्या फुटपाथवरील भाजी विक्रेत्यांवर कारवाई करून जप्त केलेले कांदे व बटाटे गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले.सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी रूपाली माने यांच्या उपस्थितीत अतिक्रमण पथकाच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT