Satara municipal council: साताऱ्याच्या उपनगराध्यक्षपदी ॲड. डी. जी. बनकर

स्वीकृत नगरसेवकपदी शंकर माळवदे, पंकज चव्हाणांसह भंडारी, भणगे व पवारांची निवड
Satara municipal council
Satara municipal council: साताऱ्याच्या उपनगराध्यक्षपदी ॲड. डी. जी. बनकरPudhari Photo
Published on
Updated on

सातारा : सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी ॲड. डी. जी. बनकर यांची तर स्वीकृत नगरसेवकपदी शंकर माळवदे, पंकज चव्हाण, रीना भणगे, सुनीलकुमार भंडारी, रवी पवार यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.

सातारा पालिकेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी बोलावलेली सर्वसाधारण सभा श्री छत्रपती शिवाजी सभागृहात नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी पार पडली. उपनगराध्यक्षपद हे खा. उदयनराजे गटाकडे असल्यामुळे नगरसेवक ॲड. डी. जी. बनकर यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे अर्ज सादर केला. यावेळी खा. उदयनराजे भोसले व नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर सुरु झालेल्या सभेत झालेल्या छाननी प्रक्रियेत अर्ज वैध ठरला.

उपनगराध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्याने व तो वैध ठरल्याने नगरसेवक ॲड. डी. जी. बनकर यांची बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर दुपारी 1 वाजता स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी पाच जणांनी या पदासाठी लेखी अर्ज सादर केले. त्यामध्ये खा. उदयनराजे गटाकडून शंकर माळवदे तसेच पंकज चव्हाण, ना. शिवेंद्रराजे गटाकडून सुनीलकुमार भंडारी व रवी पवार आणि भाजपकडून रीना भणगे यांची निवड करण्यात आली.

नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असल्याने या समितीत सर्व सभापती व सदस्य म्हणून 3 नगरसेवक असे सदस्य राहतील. तसेच यावेळी उपनगराध्यक्षांकडे पाणीपुरठा व जलनिस्सारण समिती देण्यावर सभागृहाचे एकमत झाले. उपनगराध्यक्ष हे पाणीपुरवठा समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून काम पाहणार आहेत. याच सर्वसाधारण सभेत सार्वजनिक बांधकाम समिती, शिक्षण व क्रीडा तसेच सांस्कृतिक समिती, स्वच्छता व वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती, पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती, नियोजन आणि विकास समिती तसेच महिला व बालकल्याण समिती तसेच दुर्बल घटक विशेष कल्याणकारी समितीची सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली.

निवडीनंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर म्हणाले, कुणावर अन्याय, कुणाला कमी लेखून, कुणाला नाराज करुन कोणतीही गोष्ट झालेली नाही. सातारा पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी जागा शोधणे व ती खरेदी करण्यापर्यंत सारा व्याप सांभाळला. जागा खरेदी 1 रुपया व मुद्रांक शुल्क 117 रुपये एवढ्या नाममात्र खर्चात कोट्यवधींची 40 गुंठे जागा नगरपालिकेला मिळाली. बहुमजली इमारत बांधण्यात खा. उदयनराजे भोसले व ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे श्रेय आहे.

उपनगराध्यक्षपदासाठी माझ्यासह अनेकांची नावे चर्चेत होती. नेतृत्वाने संधी दिल्याने सातारकरांच्या हिताचे काम करणार आहे. साताऱ्याला चोवीस तास पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. साताऱ्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार कामे करुन नगरपालिका उत्पन्नाची साधने तयार करणार आहे. घरपट्टीतून नागरिकांना मुलभूत सुविधा देणार आहे. सातारा पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनू देणार नाही. भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक कामकाज करणार, अशी ग्वाही ॲड. डी. जी. बनकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news