नेवाळी : कल्याण डोंबिवलीतील भाजप-शिवसेनेतील राजकीय कुरघोडीची ठिणगी आता ठाणे महानगरपालिकेच्या वेशीवर असलेल्या कल्याण फाटा चौकापर्यंत पोहोचली आहे. कल्याण फाटा चौकात सिग्नल यंत्रणा बुधवार पासून सुरु करण्यात आली आहे. या यंत्रणेचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी सकाळच्या सुमारास लोकार्पण आटपून घेतले होते. त्यानंतर सायंकाळी भाजपाचे माजी आमदार सुभाष भोईर आणि नगरसेविका वेदिका पाटील यांनी देखील आपलॆ शक्तिप्रदशर्न करून लोकार्पण केले आहे.
कल्याण शीळ रस्त्यावरील कल्याण फाटा चौक हा अत्यंत वर्दळीचा परिसर आहे. या चौकाच्या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. या पार्श्वभूमीवर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. विशेष म्हणजे माजी आमदार सुभाष भोईर यांनी जुलै २०२५ मध्येच कल्याण फाटा येथे सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडे केली होती.
त्यानंतर नगरसेविका वेदिका पाटील यांनी देखील मागणी केली होती. त्यानंतर आता सिग्नल यंत्रणा कार्यन्वित झाली आहे.मात्र यंत्रणा ससुरु होत असताना कार्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला राजकीय किनार लागली आहे. शिवसेना भाजपात सुरु असलेल्या वादाची किनार लागली आहे. सकाळी शिवसेनेने आपल्या नगरसेवकांसह केलेल्या लोकार्पणानंतर सायंकाळी भाजपाने केलेलं लोकार्पण चर्चेत आलं आहे. मात्र प्रत्यक्षात या सिगंल यंत्रणा नावापुरती राहिलीय सून अजूनही ती कार्यन्वित झालेलीच नसल्याचे समोर आले आहे.
कल्याण फाटा चौकाची झालेली दुरावस्था एका बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीने केली आहे. तर त्या चौकाचे काम देखील अद्याप अपूर्ण आहे. सण २००७ साली या चौकाला शिक्षण महर्षी नारायण पाटील यांचे नाव महासभेत ठराव करून देण्यात आले होते. मात्र ते नाव देखील अद्याप चौकाला देण्यात आलं नाही. त्यामुळे सकाळच्या झालेल्या लोकार्पणावर अनेक जणांकडून नाराजी व्यक्त खुद्द आमदार मोरे हे लोकार्पण करत असताना कार्यक्रम स्थळी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे युतीतील हे वाद आता कल्याण डोंबिवलीतील वादाची ठिणगी ठाण्याच्या वेशीवर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.