Ganeshotsav 2026 : कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क माफ

१० सप्टेंबरपूर्वी खड्डेमुक्त रस्त्यांचे आदेश; आयुक्त अभिनव गोयल यांचा फतवा
Ganeshotsav 2026
Ganeshotsav 2026pudhari photo
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाही मोठा दिलासा मिळाला आहे. आयुक्त अभिनव गोयल यांनी गणेशोत्सव मंडळांकडून मंडप शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

गणेशोत्सवाची परवानगी यंदा ऑनलाईन एक खिडकी योजनेतून देण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करताना ज्या मंडळांना अडचण येईल, त्यांच्यासाठी प्रभाग स्तरावर स्वतंत्र खिडकी सुरू करून प्रत्यक्ष अर्ज स्वीकारण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. गणेशोत्सव शांततेत आणि निर्विघ्‍नपणे पार पडावा यासाठी प्रभाग स्तरावर विविध संस्था आणि नागरिकांच्या बैठका घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Ganeshotsav 2026
Central Kitchen Scheme Maharashtra : आश्रमशाळा 'सेंट्रल' किचन योजनेचा मुद्दा 'सेंटर'वर

विसर्जन घाटांवर विद्युत रोषणाई, स्वच्छता, सफाई कर्मचारी, सीसीटीव्ही आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी जीवरक्षकांची नियुक्ती करण्यावरही भर देण्यात आला आहे.

गणेशोत्सवापूर्वी कल्याण-डोंबिवलीतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत. १० सप्टेंबरपूर्वी केडीएमसी हद्दीतील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत, असेही निर्देश आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले आहेत.

Ganeshotsav 2026
Thane Crime : भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

विसर्जन आपल्या दारी...

सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केडीएमसीच्या कृत्रिम तलावात करणे बंधनकारक असून, त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. गणपती विसर्जन आपल्या दारी ही संकल्पनाही यावर्षी प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news