JNPT CONCOR Suspension Pudhari
रायगड

JNPT CONCOR Suspension: जेएनपीए परिसरातील लॉजिस्टिक नेटवर्कला मोठा फटका; डीआरटी-कॉन्कोर सीएफएसचा परवाना रद्द

सुरक्षेतील गंभीर त्रुटी आणि चोरीच्या घटनांनंतर कस्टम्सची कडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

राजकुमार भगत

उरण: जवाहरलाल नेहरू पोर्ट परिसरातील वाढत्या सुरक्षा त्रुटी आणि चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत, सीमाशुल्क विभागाने राज्य संचलित 'कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.' (कॉन्कोर ) च्या द्रोणागिरी येथील रेल्वे-लिंक्ड कंटेनर फ्रेट स्टेशनची मान्यता तत्काळ प्रभावाने निलंबित केली आहे.

आधीच मध्य पूर्वेतील आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे त्रस्त असलेल्या भारतातील या सर्वात मोठ्या कंटेनर गेटवेच्या लॉजिस्टिक नेटवर्कवर या कडक निर्णयामुळे प्रचंड ताण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुरक्षेच्या अभावामुळे कारवाई

सुमारे ५९ एकर क्षेत्रात पसरलेल्या आणि दरमहा तब्बल १४,००० टियूई (कंटेनर क्षमता) हाताळणाऱ्या 'द्रोणागिरी रेल टर्मिनल' वर ही धडक कारवाई करण्यात आली आहे.हाताळणी आणि कस्टम्स क्षेत्र नियम'चे तंतोतंत पालन करण्यासाठी आणि सुरक्षा उपाययोजना मजबूत करण्यासाठी जवाहरलाल नेहरू कस्टम हाउसने यापूर्वी सर्व सेवा प्रदात्यांना स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.

मात्र, या सूचनांनंतरही 'कॉनकोर'च्या द्रोणागिरी सीएफएसमध्ये सुरक्षेच्या गंभीर त्रुटी आणि निर्यातीच्या मालाची चोरी झाल्याचे तपासात उघडकीस आले. या सुरक्षेच्या अभावामुळे २२ जुलै रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली.

सीमाशुल्क विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, २२ जुलैपूर्वी सीएफएस आवारात आधीपासूनच दाखल असलेल्या आयात आणि निर्यातीच्या मालाची योग्य प्रक्रियेनंतर विल्हेवाट किंवा क्लिअरन्स करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, तत्काळ प्रभावाने नवीन कोणताही आयात-निर्यात माल स्वीकारण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.या कारवाईमध्ये केवळ एकच विशेष अपवाद ठेवण्यात आला असून, २३ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजेपूर्वी ज्या मालाचे 'शिपिंग बिल' किंवा 'बिल ऑफ एंट्री' दाखल झाले आहे आणि ज्यांची अंतिम जागा म्हणून 'कॉनकोर-डीआरटी सीएफएस'ची नोंद झाली आहे, अशाच मालाला सीएफएस आवारात प्रवेश दिला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT