JNPA Nhava Sheva Suspicious Container Pudhari
रायगड

JNPA Nhava Sheva Suspicious Container: उरण जेएनपीए पोर्टवर संशयास्पद कंटेनर जप्त

७१ लाख ४० हजारांच्या वॉशिंग मशिन्स असल्याचे निष्पन्न; सीआयएसएफ, कस्टम्सची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

उरण: जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) न्हावाशेवा येथे सुरक्षेच्या कारणास्तव तपासणी दरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) एक संशयास्पद कंटेनर ताब्यात घेतला. पुढील सखोल तपासणीसाठी हा कंटेनर तत्काळ सीमाशुल्क विभागाच्या (सीमाशुल्क विभाग) अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आला आहे.

कंटेनरचे स्कॅनिंग केल्यानंतर कस्टम्स अधिकारी आणि टर्मिनल ऑपरेटर यांनी प्रत्यक्ष तपासणीसाठी हा कंटेनर कंटेनर फ्रेट एरिया येथे रिकामा केला.

यामध्ये आयात नियमांचे उल्लंघन करून आणलेला मुद्देमाल आढळला आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या भौतिक तपासणीदरम्यान त्या कंटेनरमध्ये २४६ फ्रंट-लोड वॉशिंग मशिन्स आढळून आल्या. यामध्ये ६ किलो क्षमतेच्या १४७ वॉशिंग मशिन्स आणि ८ किलो क्षमतेच्या ९९ वॉशिंग मशिन्सचा समावेश आहे.

या सर्व वॉशिंग मशिन्सची एकूण बाजारपेठेतील किंमत सुमारे ७१ लाख ४० हजार रुपये इतकी असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, सखोल तपासणीत कोणतीही लपवलेली बेकायदेशीर सामग्री अथवा इतर वस्तू आढळून आल्या नसल्याचे सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

याप्रकरणी सीमाशुल्क (कस्टम्स) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा माल कुठून आला आणि तो कोणाकडे पाठवला जाणार होता, याचा पुढील तपास सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT