पेण : पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईला अतिवेगाने जाण्यासाठी सिडकोद्वारे जिते आणि बेलवडे येथे जल बोगद्याचे काम मेघा इंजिनियर कंपनीला दिले आहे. याद्वारे येथे 300 फुट खोदकामाची निर्मिती केली जात असल्याने या कामामुळे मुंगोशी- बेलवडे गावाला अनेक समस्या निर्माण झाल्या असून कंपनीमार्फत केमिकल युक्तपाणी नदीमध्ये सोडण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
त्यामुळे हे पाणी बंद करण्यासाठी येथील ग्रामस्थ मेघा इंजिनियर कंपनी कार्यालयात गेले असता येथील कंपनीने ठेवलेल्या जिते येथील गावगुंडांकडून मुंगोशी गावातील महिला व नागरिकांना मारहाण करण्यात आल्याची माहिती सर्व ग्रामस्थांनी रात्री उशिरा आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन दिली यावेळी त्या ठिकाणी मोठे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सिडको द्वारे मुंगोशी बेलवडे येथे होणारा प्रकल्प या प्रकल्पामुळे गावात दूषित पाणी येत असून अनेकजण आजारी पडत आहेत याबाबत आम्ही संबंधित कंपनीला विचारणा करण्यासाठी गेलो असता त्याठिकाणी मोहन आणि सुभाष ही नामक व्यक्ती यांनी आवाज चढवून जिते येथील चार पाच मुलांना बोलवून घेतले आणि त्यानंतर येथे झटापट होत त्यांनी महिलांना मारहाण केली आमच्या एका महिलेने पोलिसांत तक्रार दिली असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उपस्थित महिला ग्रामस्थांनी केली आहे.
सिडकोच्या माध्यमातून मुंगोशी बेलवडे गावात होणारा दूषित केमिकल युक्त पाणीपुरवठा यामुळे येथील अनेकांना विविध आजार उद्भवले आहेत याबाबत आम्ही अनेकदा त्यांना सांगितले. मात्र याकडे लक्ष देत नसल्याने अखेर सर्व ग्रामस्थ कंपनीच्या कार्यालयाजवळ जाऊन विचारणा करत दूषित पाणी बंद करण्याचे सांगितले असता त्या ठिकाणी बाहेरची पाच मुले येऊन त्यांनी महिलांना धक्काबुक्की मारहाण केली त्यांच्यावर तात्काळ कारवाई होऊन कंपनीकडून होणारा दूषित पाणीपुरवठा तात्काळ बंद करावा.मितेश गोळ, ग्रामस्थ मुंगोशी