सुधीर नाझरे
मुरुड जंजिरा: मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला हा मंगळवार 26 मे 2026 पासून बंद करण्यात येणार आहे.नियमानुसार समुद्राला येणारे वादळीवारे व लाटांचा वाढत जोर पाहता पर्यटकांच्या सुरक्षेतला मेरीटाईम बोर्डाने जंजिरा किल्ला बंद करण्याचे जाहीर केले.येणाऱ्या शेवटचा शनिवार-रविवारची सुट्टी साधून असंख्य पर्यटकांनी किल्ला पाहाण्यासाठी अलोट गर्दी होणारआहे.
किल्ला पहाण्यासाठी औरंगाबाद,जालना,परभणी,कल्याण,डोंबीवली,बोरिवली आदी भागातून हजारो पर्यटक मोठ्या संख्येने येतात.मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने किल्ल्याच्या प्रवेश द्वाराजवळ मोठी गर्दी होते.त्यातच पावसाळाजवळआल्याने लाटांचा प्रवाह वाढल्याने शिडाच्या बोटी हेलकावे घेत असल्याने किल्ल्यावर उतरणे जिकरीचे झाले होते.
परंतु थोड्या संयमाने पर्यटक किल्ल्याच्या प्रवेश द्वाराजवळ उतरावे लागते त्यासाठी नूतन जेटी बांधण्यात आली आहे. जेट्टी किल्ल्याच्या मागील बाजूस असल्याने 500 मीटर लांब असल्याने पर्यटकांना चालावे लागते,जेट्टीवर सावलीसाठी शेड नसल्याने पर्यटक नाराज आहेत.
किल्ल्यावर गर्दी होते, म्हणूच असंख्य पर्यटकांनी शिडाच्या बोटींमधून किल्ल्यास प्रदक्षणा घालून किल्ल्याचे रूप बाहेरून पाहण्यात समाधान मानतात. सद्या किल्ल्यावर तिकीट घेण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी पहावयास मिळते. शेवटचा शनिवार रविवार असल्याने किल्ल्यावर मोठी गर्दी ओसंडून होणार आहे. मंगळवार पासून हा किल्ला तीन महिने बंद राहणार असून सप्टेंबर महिन्यात पुन्हा याची दालने उघडणार आहेत.
शिडाचे बोट धारक नाराज
शिडाच्या बोटीवर काम करणाऱ्या लोकांना हा शेवटचा रोजगार असून तद्नंतर त्यांना तीन महिने घरीच बसावे लागणार आहे.म्हणून जास्ती जास्त पर्यटकांना किल्ल्यावर नेण्याचा प्रयत्न शिडाच्या बोटीधारकांनी केला.पावसाळ्यानंतर किल्ल्याचा पुढील गेट बंद होणार असून नूतन जेटीच चालू राहणार असल्याने शिडाचे बोट धारक नाराज आहेत.