Raigad Zilla Parishad fund: पंधराव्या वित्त आयोगांतर्गत रायगडला 52 कोटींचा निधी

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अंतिम आराखड्यास मंजुरी; स्वच्छतेसह पाणीपुरवठ्याच्या कामांवर भर
Raigad Zilla Parishad fund
Raigad Zilla Parishad fundPudhari
Published on
Updated on

अलिबाग: रायगड जिल्हा परिषदेची विशेष सभा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत पंधराव्या वित्त आयोगांतर्गत 2025-26 या वर्षाकरीता स्थानिक स्वाराज्य संस्थांना वाटप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अंतिम आराखड्यास उपस्थित सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीच्या सभापतींच्या अनुमोदनानंतर मंजुरी देण्यात आली. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत रायगड जिल्ह्याला 52 कोटींचा 72 लाख 80 हजार 990 रुपये निधी प्राप्त झाला आहे.

ग्रामविकास विभागाकडून 2022-23, 2023-24, 2024-25 व 2025-26 या वर्षातील 15व्या वित्त आयोगाचा एकूण 52 कोटी 72 लाख 80 हजार 990 रुपये निधी रायगड जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, अर्थ सभापती चंद्रकांत कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली वित्त विभागाने प्राप्त बंधित व अबंधित अनुदानातून करावयाच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला होता.

Raigad Zilla Parishad fund
Diesel Tanker Overturns: महामार्गावरील घोणसे घाटात डिझेलचा टँकर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

15व्या वित्त आयोगांतर्गत मिळालेल्या निधीपैकी 30 टक्के निधी हा स्वच्छता, 30 टक्के निधी हा पाणीपुरवठा व उर्वरित 40 टक्के निधी हा इतर मूलभूत कामांसाठी वापरण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. या आराखड्याला उपस्थित सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापतींनी अनुमोदन दिल्यानंतर अंतिम मंजुरी देण्यात आली.

Raigad Zilla Parishad fund
Marathi Signboard: मराठी पाट्यांसाठी महापालिका आक्रमक; 60 निरीक्षकांच्या फौजेसह मुंबईत व्यापक मोहीम राबवणार

या सभेसाठी उपाध्यक्ष मधुकर पाटील, अर्थ सभापती चंद्रकांत कळंबे, महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जालिंदर पठारे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विशाल तनपुरे, जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी, गीता जाधव, दिलीप भोईर, विकास गोगावले, गटनेते संतोष बैलमारे, प्रतोद अमित नाईक, सचिन राउळ, अदिती दळवी, अनंत गोंधळी, इतर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

15व्या वित्त आयोगाचा 52 कोटी 72 लाख 80 हजार निधी आला असून यातून विविध कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये स्वच्छता व पाणीपुरवठा याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतर कामेही वेगाने होती.

- मंगेश वाकडीकर, अध्यक्ष, जिल्हा परिषद

15व्या वित्त आयोगाचा 4 वर्षांचा निधी एकत्रितपणे आता देण्यात आला आहे. या निधीअंतर्गत विविध कामे करण्याचा आराखडा आम्ही तयार केला असून सभागृहाने त्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता विकास कामांना गती येणार असून सर्वांना सामान्य न्यायाने निधीचे वितरण करण्यात येणार आहे.

- चंद्रकांत कळंबे, अर्थ सभापती, जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news