Bullet Train File Photo
रायगड

India Bullet Train Corridor: भारतात वेगवान प्रवास सुरू होणार; ७ बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजुरी

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

रायगड: भारतात हायस्पीड रेल्वेच वेगवान प्रवस सुरु होणर आहे. यासाठी रेल्वे नेटवर्कचा विस्तार केला जात असून रेल्वे मंत्रालयाने ७ नव्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. यामुळे भारतातील प्रमुख शहरे हायस्पीड रेल्वेने जोडली जाणार आहेत.

यामध्ये बेंगलोर, चेन्नइ, हैद्राबाद, पुणे, मंबई, दिल्ली, लखनऊ, वाराणसी, सिलीगुडी, पाटणा अशी शहरे या रेल्वेने जोडली जाणर आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषण केली आहे. मुंबई-पुणे हायस्पीड रेल्वे ४८ मिनीटांत जाणार आहे.

दिल्ली-सिलीगुडी : ६ तास, दिल्ली-वाराणसी : ३ तास १५ मिनिटे, दिल्ली-लखनऊ : १ तस २ मिनिटे, पुणे-हैदराबाद : २ तास, बेंगलूर चेन्नई १ तास, बेंगलुरु-हैदराबाद : २ तास असा वेळ लागणर आहे. या हायस्पीड मार्गामुळे भारताच्या प्रमुख शहरांच्या प्रवासाचा वेग वाढणार असून प्रवासाला लागणारा वेळ कमी होणार आहे. त्‍यामुळे भारतातील अंतर्गत शहरांच्या कनेक्टीवीटीला वेग येणार आहे.

एकीकडे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग वेगाने बांधला जात असताना आता केंद्र सरकारने देशभरात ७ नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजूरी दिली आहे. यामुळे प्रमुख शहरातील प्रवासाची वेळ कमी होणारा आहे आणि रेल्वे कनेक्टिव्हीटीला नवा वेग येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की या नव्या हायस्पीड रेल्वे योजना पूर्ण झाल्यानंतर देशातील अनेक मोठ्या शहरातील प्रवासात अवघ्या काही तासांत पूर्ण होणार आहे.

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन योजनेचे अधिकृत काम साल २०१७ मध्ये झाले होते. ५०८ किलोमीटर लांबीच्या या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर जपानच्या तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्याने विकसित केला जात आहे.

जपानची प्रसिद्ध शिंकानसेन बुलेट ट्रेन म्हटले जाते. यास भारताच्या हाय स्पीड रेल्वे नेटवर्कचा पाया मानला जातो. सरकारचे म्हणणे आहे की नवीन कॉरिडॉरला मंजूरी दिल्याने देशात वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक रेल्वे प्रवासाचे नवीन युगाची सुरुवात होणार आहे.

बुलेट ट्रेनचे हायस्पीड मार्गाचे नेटवर्क

मुंबई-पुणे : ४८ मिनिटे

बेंगलुरु-चेन्नई : १ तास १३ मिनिटे

बेंगलुरु-हैदराबाद : २ तास १० मिनिटे

पुणे-हैदराबाद : २ तास ८ मिनिटे

दिल्ली-लखनऊ : १ तास 2 मिनिटे

दिल्ली-वाराणसी : ३ तास १५ मिनिटे

दिल्ली-सिलीगुडी : ६ तास

दिल्ली-वाराणसी-पाटणा कॉरिडोरला मंजूरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT