सुधागड : गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे पाली परिसरात शेकडो वाहनांचे मोठे नुकसान झाले असून पुराचे पाणी आणि रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात वाहने अडकल्याने अनेक गाड्या नादुरुस्त झाले आहेत. परिणामी परिसरातील बहुतांश गॅरेज दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांची हाउसफुल झाली असून मेकॅनिकल वर कामाचा मोठा ताण निर्माण झाला आहे.
आधुनिक वाहनांमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल यंत्रणाचे प्रमाण अधिक असल्याने पाणी शिरताच वायरिंग सेन्सर्स आय सी यु आणि इतर महत्त्वाचे पार्टस निकामी होत आहेत त्यामुळे वाहनधारकांना हजारो रुपयांचा दुरुस्तीचा खर्च करावा लागत आहे. अनेक गॅरेजमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून दुरुस्तीसाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.
पालीतील गॅरेज मालक सचिन ढोबळे यांनी सांगितले की पावसानंतर वाहनांच्या दुरुस्तीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे ग्राहकांच्या गाड्या वेळेत दुरुस्त करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून त्यांच्या स्वतःच्या गॅरेजमध्येही पाणी शिरल्याने साहित्य आणि सुट्ट्या भंगांचे नुकसान झाले आहे
वाहनधारक अमित निंबाळकर यांनी सांगितले की त्याच्या दोन कार पुराच्या पाण्यात बुडाल्याने इंजिन व अंतर्गत भागात पाणी गेले त्यामुळे दोन्ही गाड्या सुरू होत नव्हत्या तपासानंतरही मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल दुरुस्ती करावी लागल्याने अनपेक्षित आर्थिक फटका बसला.दरम्यान,तालुक्यातील अन्य गावातील वाहनांची अशीच पावसाने नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
वीमाधारकांना काहीसा दिलासा
केवळ सेकंड पार्टी किंवा थर्ड पार्टी युवा असलेल्या वाहनधारकांना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागत आहे अशा विमा पॉलिसीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे वाहनांचे झालेले नुकसान अनेकदा भरून मिळत नाही मात्र सर्व समावेशक विमा आणि इंजिन प्रोटेक्ट सारखे अतिरिक्त कव्हर असलेल्या वांधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याने याची शक्यता असते त्यामुळे वाहन विमा घेताना नैसर्गिक आपत्तीचा समावेश असलेले संरक्षण कव्हर निवडण्याची गरज वाहन तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे