Raigad Fort Water Storage Pudhari
रायगड

Raigad Fort Water Storage: किल्ले रायगडावर मुबलक जलसाठा; मुसळधार पावसाने गंगासागर, हत्ती तलाव ओव्हरफ्लो

गडावर येणाऱ्या शिवभक्तांना दिलासा!

पुढारी वृत्तसेवा

श्रीकृष्ण बाळ

महाड: हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर मागील काही महिन्यात भेटसावणाऱ्या पाणीटंचाई संदर्भात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने गडावरील प्रमुख गंगासागर हत्ती तलाव यांसह बारा टाक्यांमधील झालेल्या पाण्याने हे भरून वाहत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून तसेच शासकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे.

चालू वर्षी गंगासागर व हत्ती तलावातील पाणी पूर्णपणे संपल्यामुळे किल्ले रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याकरता प्रशासनाला विशेष प्रयत्न करावे लागले होते या पार्श्वभूमीवर जून महिन्याच्या अखेरीस व जुलै च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या महाड तालुक्यातील मुसळधार पावसाने शिवभक्तांना मोठा दिलासा दिला असून गडावरील या प्रमुख तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने आगामी मोसमाकरिता तो उपयुक्त ठरेल असे मानले जात आहे.

गडावर ज्या पद्धतीने तलावाची बांधकाम करण्यात आले आहे अशाच पद्धतीने शिवकालीन तलावांची निर्मिती या टंचाईग्रस्त गावांच्या परिसरामध्ये केली गेल्यास त्या ठिकाणाहून शेजारील विविध वाड्यावरती ना दैनंदिन स्वरूपात पाणीपुरवठा करणे शक्य होईल असे मत या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

एकूणच किल्ले रायगडावरील आता पाणीसाठा मध्ये झालेली वाढ ही गडावर येणाऱ्या शिवभक्तांसह प्रशासकीय यंत्रणेला दिलासा देणारी ठरल्याचे मानले जात आहे.

शिवकालीन किल्ल्यावर पाण्याचे उत्तम नियोजन

महाड तालुक्यामध्ये जवळपास १०० पेक्षा जास्त वाड्या व १५ पेक्षा जास्त गावांमध्ये गेल्या दोन दशकांपासून भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्याचे प्रयत्न आजही आपुरेस ठरले असताना साडेतीनशे वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर बांधण्यात आलेल्या या तलाव व टाक्यांमुळे गडावरील तत्कालीन नागरिकांसाठी व आज त्या ठिकाणी येणाऱ्या हजारो शिवभक्तांना त्यांची दैनंदिन गरज पूर्ण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT