मुरुड तालुक्यामध्ये दहा हजार गणेशमूर्ती घेत आहेत आकार pudhari photo
रायगड

Ganesh Murti Manufacturing : मुरुड तालुक्यामध्ये दहा हजार गणेशमूर्ती घेत आहेत आकार

अधिक महिन्यामुळे कामावर झालेला परिणाम; आता ४७ गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये लगबग; किमतीत २० टक्के वाढ

पुढारी वृत्तसेवा

मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे

मुरुड तालुक्यात ४७ गणेश मूर्ती कारखाने असून अंदाजे दहा हजार मूर्ती आकार घेत आहेत. मूर्तीचे मातीकाम वेगाने सुरु आहे . सतत पडणाऱ्या पाऊसाने मूर्ती बनवण्यासाठी बाहेरील उघडी जागा वापरता येत नाही व घरात लाईट जात असल्याने काम करत येत नाही .कारखानदारांची मुख्य अडचण आहे ती मूर्ती कामगार नवीन तयार होतनसल्याने काम मंद गतीने होत असल्याचं खंत कारखानदार श्रीकांत सुर्वे यांनी बोलून दाखवली.

मुरुड शहरात १३, एकदरा २, खरआंबोलीत २, तेलवडे १ ,शिग्रे ३, वनणदे ३, राजपुरी ३, अागरदांडा, सावली नांदले, खामदे ,उसंडी ,माजगाव ,तल्लेखर,प्रत्यकी १ कारखाना आहे .ह्यावर्षी देखील शाडूची माती महागल्याने मूर्तीची किंमत वाढणार आहे.

गणेश मूर्ती कारखाने पावसाळ्यात सुरु होतात ,आणि पावसाळ्यात विजेची दुरुस्तीची कामे सतत चालू आल्याने सर्व कारखानदाराना खप त्रास सहन करावा लागतो ,तीच कामे वीजमंडळाने एप्रिल नमुन्यात करावी अशी मागणी करत आहेत ,तसेच समस्त घकांना आव्हान आहेकी गणेश मूर्तीचा पाट एप्रिल महिन्यात आणल्यास कारखानदारांचे काम सोपे होईल.

मुरुड तालुक्यातील सर्वच कारखान्यात मूर्ती शाडूच्या मातीच्याच बनवतात अपवाद काही कारखानदार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तयार मुर्त्या ग्राहकांना स्वस्त पाहिजेत म्हणून आणतात .मुरुड शहराला मूर्तिकारांनी परंपरा आहे .जेष्ठ मूर्तिकार वसंत जंजीरकर मुरुड मध्ये जल्माला आले आणि मुरुडच्या नाव इतिहासात लिहून गेले.अशी परंपरा असलेली गणेश मूर्तिकार पैश्याकडे न पाहता कलेचा वारसा पुढे चालवत आहे ,मुरुडच्या मूर्ती पाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातून कलाकार मंडळी येतात.

सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना परवानगी दिली असून फक्त त्यांचे विसर्जन कृत्रिम विहिरीत करावे समुद्रात करू नये अशा सूचना शासनांना कडून देण्यात आल्यात .परंतु मुरुडला शहरात ९० टक्के मूर्ती शाडूच्या मातीच्या बनतात फक्त १० टक्के मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बाहेरून विकत आणल्या जातात कारण किमतीने स्वस्त असल्याने काही भाविकांना परवडतात.

कारखानदार श्रीकांत सुर्वे यांनी सांगितले की, मुरुड शहराला जागतिक कीर्तीचे गणेश मूर्ती कारखानदार होऊन गेलं अशी परंपरा असलेल्या गावात मूर्ती बनवणारे नवीन कामगार तयार होत नसल्याचे पुढे कारखाने चालवणे कठीण होणार आहे. सुर्वे म्हणले शासनाने शाळां मध्ये गणेश मूर्ती कामाचे प्रशिक्षण वर्ग सुरु केल्यास मुरुडच्या कारखानदार युनियन चे सदस्य प्रत्यक्ष शाळेवर जाऊन मोफत प्रशिक्षण देण्यास तयार आहे .

जेणे करून नवीन मूर्ती कामगार तयार होतील .युवा वर्ग ह्याकामाकडे आकर्षिला जाईल सद्य शाडूच्या मातीचे व रंगाचे भाव २० टक्क्यांनी वाढल्याने मूर्तीचे भाव वाढण्याची शक्यता सुर्वे यांनी बोलून दाखवली .मुंबईत गणेश मूर्तिकारखानदाराना पालिका मूर्ती बनवण्यासाठी जागा उपलब्ध करून देते .मुरुड नगरपालिकेने तशी जागा दिल्यास कारखान्याचा विस्तार करण्यास सोपा होईल.

माझ्या घरी गणेश मूर्ती १ दिवस आधी आणण्याची प्रथा आहे व ५ पिढ्या आमच्याकडे शाडूची मातीची मूर्ती आणली जाते. मूर्तींचे वाढते भाव श्राद्धे समोर टिकत नाही ,गणपती सण असा आहे कि घरातील सर्व माणसे एकत्र येतात प्रेम विचार आचार यांचे आदानप्रदान होत असल्याने गणेश मूर्तीतील सुंदरता जपणारे मुरुडकर आहे ,मुरुडच्या गणेश मूर्ती रायगडात प्रसिद्ध आहे .मुरुड कोळीवाड्यातील मूर्ती पाहण्यासाठी कोकणातून कलाकार येतात.
संजय गुंजाळ, गणेशभक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT