Maharashtra fake jewellery fraud Pudhari
रायगड

Maharashtra fake jewellery fraud: बनावट सोन्याच्या दागिन्यांनी 15 लाखांची फसवणूक

आंतरराज्यीय टोळी जाळ्यात, म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा: म्हसळा तालुका शहरात नामांकित व्यापाऱ्याला बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवून तब्बल 15 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला रायगड पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार आरोपीनी फिर्यादी यांना कमी दरात खरे सोन्याचे दागिने विक्रीस असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादींकडून 15 लाख रुपये घेऊन बनावट दागिने देण्यात आले.

पैसे घेतल्यानंतर आरोपी पसार झाले. फिर्यादींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीनी संगनमताने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी क्रमांक 3,4 व 5 यांनी मुख्य आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचे तपासात समोर आले.

त्यानंतर पोलिसांनी किल्ला,ता. रोहा येथून आरोपींना ताब्यात घेत दिनांक 22 मे 2026 रोजी रात्री अटक केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून आरोपींकडे अधिक चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नागरिकांना पोलीस प्रशासनाने फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

ही कारवाई रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच श्रीवर्धन विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई पथकात सपोनि रविंद्र पारखे,पोलीस उपनिरीक्षक तपास अधिकारी सुमित खोत, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे,पोहवा सचिन शेलार,पोशि सागर चितारे,शौकत मुल्ला,विवेक ठाकरे आणि अक्षय पुरी यांचा समावेश होता.

आरोपी सर्व राजस्थानचे

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये केसाराम सावजी बागरी वय 47, मोहनलाल गंगाराम परमार वय 42, राजू शिलाराम राठोड वय 27, अनिल हरिराम परमार वय 26 आणि जितेंद्रकुमार मोहनलाल परमार वय 27 यांचा समावेश असून हे सर्व मूळचे राजस्थान राज्यातील जालोर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांपैकी काही ठआरोपी सध्या रोहा तालुक्यात वास्तव्यास होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT