Ganeshotsav 2024 | गणेशोत्सवासाठी रायगड पोलिसांचे ‘जागते रहो’ File Photo
रायगड

Ganeshotsav 2024 | गणेशोत्सवासाठी रायगड पोलिसांचे ‘जागते रहो’

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग ः गणेशोत्सवाची धामधूम जोरात सुरु झाली आहे .या उत्सवासाठी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा,कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रायगड पोलिसांचे जागते रहो मोहीम सुरु झाली आहे. संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आता दोन,तीन ड्रोनच्या माध्यमातून सर्व्हे केला जाणार आहे.यासाठी योग्य त्या सुचना संबंधित पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.दरम्यान,येत्या गुरुवारी ( 5 सप्टेंबर) महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.

कोकणात जाणार्‍या चाकरमानी गणेशभक्तांचा यंदा ‘वाहतूककोंडी कों व खड्डे मुक्त’ प्रवास होईल, असा दावा रायगड पोलिसांनी केला आहे. त्यात वाहतूककोंडी कों टाळण्यासाठी ड्रो न कॅमेर्‍यांद्वारे नजर ठेवली जाणार असून, जीवनावश्यक वस्तूंची वाहने वगळून या काळात इतर सर्व 16 टनांच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. गतवर्षी दोन ड्रो न कॅमेरे होते. यंदा त्यांची संख्या वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

महामार्ग 216 तास राहणार बंद

गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्ग विविध दिवशी तब्बल 216 तास बंद असणार आहे. या कालाधीत फक्त अवजड वाहनांना या मार्गावरुन वाहतूक करता येण्यास मज्जाव केला आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांना यातून सरकारने सूट दिली आहे .गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास या कालावधीत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गावर 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त वजन क्षमता असणार्‍या वाहनांना वाहतूक करण्यास मनाई केली आहे. मुंबई ते सावंतवाडीदरम्यान जड वाहनांना बंदी असणार आहे.

58 ठिकाणी सीसीटीव्ही

चाकरमान्यांचा प्रवास हा निर्विघ्न व्हावा, यासाठी रायगड पोलिसांचा बंदोबस्तही चोख राहणार आहे. यामध्ये 12 उपविभागीय पोलीस अधिकारी, 2 पोलीस निरीक्षक, 81 सहायक पोलीस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, 742 पोलिस अंमलदार, 50 होमगार्ड यांच्यासह 40 मोटारसायकली, 72 वॉकीटॉकी, 18 टोकन क्रेन, 18 रुग्णवाहिका, 58 सीसीटीव्ही तैनात राहणार आहे. महामार्गावर मोटारसायकल पेट्रो लिंगही सुरू राहील. - यासाठी 40 मोटारसायकली, 130 अंमलदार, 30 अधिकारी असून प्रत्येक पाच किमी परिसरात त्यांचे लक्ष राहील.

असा राहणार बंदीचा कालावधी

5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या कालावधीत बंदी असणार आहे. तर 5 व 7 दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवासासाठी 11 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून ते 13 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी 11 दिवसांचे गणेशमूर्तीचे विसर्जन.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT