खाडीपट्टा (रायगड) : रघुनाथ भागवत
सात दिवसांच्या लाडक्या गणरायाला मंगळवारी (दि.2) सायंकाळी निरोप दिल्यानंतर त्याचदिवशी रात्री, तर काही दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि.3) मुंबई, पुणे, सुरतवासीयांनी भरलेली गावे खाली झाली असून आपापल्या नोकरी आणि व्यवसायाकडे धाव घेतल्याने गेली आठ, दहा दिवस भरलेली गावे आज खाली झाल्यामुळे गावे पुन्हा ओस पडली आहेत. खाडीपट्टयात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तर मुले, सुना, नातवंडांना निरोप देताना वयोवृद्धांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले असल्याचे पाहायला मिळाले.
यावर्षी तब्बल सात दिवसांचा गौरी-गणपती सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. दोन दिवस गणेशोत्सवापूर्वी मुंबई, पुणे, सुरत येथे कामानिमित्ताने वास्तव्याला असणारे खाडीपट्टयातील नागरिक लाडक्या गणपती उत्सवासाठी गावी आल्यामुळे सर्व गावे गजबजुन गेली होती. सण उत्सवामध्ये आनंद आणि उत्साहाला पारावर उरला नव्हता असे वातावरण सगळीकडे पसरले होते. गावरान खालू बाज्यासह सनईचा तसेच आरत्या, भजन, संगीत भजन, हरिपाठ आणि किर्तन अशा आध्यात्मिक कार्यक्रमासह सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा, ज्येष्ठांचा सहृदय सत्कार, विविध स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल
गावांमध्ये पाहायला मिळत होती आणि ज्यामुळे गावपण निर्माण झाले होते. कामानिमित्त शहराकडे असलेल नातेवाईक गावी सणानिमित्ताने आल्यामुळे खाडीपट्टयातील सगळी गावे आठ, दहा दिवस गजबजून गेल् होती.
मंगळवारी (दि.2) बाप्पाला निरोप दिल्यानंतर त्याच दिवशी रात्री अथक बुधवारी (दि.3) दिवसभरात एसटी महामंडळाच्या गाड्या भरभरून गेल्यानंतर गावे खाली झाली. आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊन गावे ओस पडली आहेत. पन्नास-साठ घरांच्या वस्तीमध्ये केवळ वीसा बावीस माणसांची वस्ती आता फक्त राहिली असल्याने जाणार्या नातेवाईक मंडळींना निरोप देताना, मात्र गावाक असणार्या माणसांना गहिवरून आले आणि अश्रू पुसत पुसतच बाय बाय केले. हे भावुक चित्र दुःखदायी पाहण्यासारखे होते. त्यामुळे केवळ गणेशोत्सव आणि शिमगोत्सव निमित्ताने नागरिकांनी गावे भरली जातात.
लाडका गणपती बाप्पा सात दिवस खुशीचे वातावरण बनवून गेला आणि त्यालाच पुढच्या वर्षी लवकर ये अशी आर्त हाक मारून दुसऱ्या दिवशी आपल्या सर्व मुंबई, पुणे, सुरतवासी नातेवाईकांना देखील गावी राहणाऱ्या माणसांनी निरोप दिला. परंतु निरोप देताना देखील त्याच पाणवलेल्या डोळ्यांनी सुखात रहा... जपून काम करा... गावची काळजी करू नका... अशी मायेची काळजी देखील नातेवाईकांना बाय-बाय करून पाठवलेला डोळ्यांना पदराने पुसून लवकर या अशी विनवणी करून बाय-बाय केले.