दोन हजार 100 रुपयांचा एअरफ्रायर पडला तब्बल 70 हजार रुपयांना  pudhari photo
रायगड

Raigad Cyber crime : दोन हजार 100 रुपयांचा एअरफ्रायर पडला तब्बल 70 हजार रुपयांना

अनोळखी इसमाविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : एअरफ्रायरची रद्द झालेल्या ऑर्डरविषयी तक्रार दिल्यानंतर फ्लिपकार्ट या कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे मोबाइलचा एक्सेस घेऊन आणि बँक खात्याची माहिती घेऊन 70 हजार 184 रुपये ट्रान्सफर केल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

योगेश प्रभाकर मोहन (कमांडर रेनी सन्स बिल्डिंग, नेरे) यांनी फ्लिपकार्टवर एअरफ्रायरची ऑर्डर दिली. त्यांनी गुगल पेवरून पेमेंट पाठवले. त्यांची ऑर्डर अचानक रद्द झाली. यावेळी त्यांनी एक्स वेबसाईटवरील अकाउंटवरून फ्लिपकार्टच्या वेबसाईटच्या नावे तक्रार करून फ्लिपकार्ट यांना टॅग केले. त्यानंतर संपर्क केला असता व्हिडिओ कॉल करून ॲप दाखवण्यास सांगण्यात आले.

व्हॉट्सॲप वरून व्हिडिओ कॉल आल्यानंतर त्यांना स्क्रीन शेअर करण्यास सांगून स्क्रीन शेअरचा एक्सेस घेत फ्लिपकार्ट ओपन करून दाखवले.ॲप ओपन केल्यानंतर दोनशे रुपयापर्यंतचे दोन प्रॉडक्ट ऑर्डर करण्यास सांगून ते पुन्हा रद्द करण्यास सांगितले,

रिफंड झालेली रक्कम खात्यात जमा झाली का, हे पाहण्यासाठी बँकेचे ॲप ओपन करण्यास सांगितले. त्या वेळी बँक अकाउंट व डेबिट कार्ड डिटेल टाकण्यास सांगितले. डिटेल दिल्यानंतर दोनशे रुपये जमा होण्याऐवजी त्यातून 70 हजार 184 रुपये ट्रान्सफर झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT