पनवेल विक्रम बाबर : पुढारी वृत्तसेवा पनवेल तालुक्यातील ओवळा गावाच्या हद्दीत १२ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत राड्या दरम्यान काही व्यक्तींनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या घटनेचा पनवेल शहर पोलिसांना तब्बल तीन दिवसांचा अथक तपासा करावा लागला.
या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आज बैलगाडा फेम राहुल पाटील याला अटक केली आहे. राहुल पाटील यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्या प्रकरणी भादवी कलम ३/२५ नुसार गुन्हा दखल करण्यात आला आहे. राहुल पाटील याला आज त्याच्या कल्याण येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. राहुल पाटील सोबत अन्य १५ ते २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१२ मार्च रोजी पनवेल तालुक्यातील ओवळे गावात सिद्धेश नंदराजशेठ मुंगाजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार हिंद केसरी पनवेल उरण आणि सरपंच हिंद केसरी ओवळे या छकड्याच्या बिनजोड जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीचे उद्धाटन भाजप नेते पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले होते.
या शर्यतीला, कोकण, रायगड, नवी मुबई, मुबई, ठाणे शहरातील सुप्रसिद्ध बैलजोड्यांनी सहभाग नोंदवला होता. या शर्यती ला सुप्रसिद्ध बैलजोडी मालक राहुल पाटील यांचा माथूरची बैल जोडी देखील सहभागी झाली होती. या अटीतटीच्या सामन्या दरम्यान राहुल पाटील यांच्या माथूर बैल जोडीचा, शर्यतीत असलेल्या दुसऱ्या बैल जोडीने पराभव केला होता. हा पराभव झाल्या नंतर विजयी गटाने गुलाल उधळून जल्लोष सुरू केला. या दरम्यानच पराभव सहन न झाल्याने राहुल पाटील आणि दुसऱ्या गटात बाचाबाची सुरू झाली आणी या बाचाबाचीचे रूपांतर चक्क दगडफेकीत झाले. ही दगडफेक तब्बल पंधरा ते वीस मिनिट सुरू असल्याचे प्रतक्षदर्शीने सांगितले.
या दगडफेकी दरम्यान राहुल पाटील यांच्या समर्थकाकडून गोळीबार देखील झाल्याची चर्चा १२ मार्च रोजी रंगली होती. ही दगडफेक आणि गोळीबार होऊन देखील या घटनेची नोंद पनवेल शहर पोलिसांनी घेतली न्हवती. या बाबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, पनवेल शहर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आणि या तपासा दरम्यान तब्बल तीन दिवसानंतर गोळीबार झाल्याचे पोलिसात उघड झाले. पोलिसांनी या प्रकरणी घटना घडून गेल्यानंतर दोन दिवसानंतर पोलिसांनी दगडफेक करणे तसेच गोळीबार करणे असे गुन्हे दाखल केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सकाळी पोलिसांनी या प्रकरणी बैलगाडी फेम राहुल पाटील याला अटक करून आज कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. राहुल पाटील याला त्याच्या कल्याण येथील राहत्या घरातून अटक केली आहे. राहुल पाटील यांच्या सोबत जवळपास १५ ते २० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत.
हेही वाचा :