Burning Car Incident Kerala (Pudhari Photo)
रायगड

Raigad News | बर्निंग कारमधून उरणमधील कुटुंब बालंबाल बचावले

Burning Car Incident Kerala | उरण ते कन्नूर-केरळ प्रवासादरम्यान कासारगोडे येथे घडली घटना

पुढारी वृत्तसेवा

Kasargod Car Fire

जेएनपीए : उरण तालुक्यातील बोरी पाखाडी हुसेन मंजिल येथे राहणारे कुट्टी कुटुंबिय उरण ते कन्नूर-केरळ प्रवासादरम्यान करीत असताना त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे बाब कुट्टी कुटुंबियांच्या वेळीच लक्षाच आल्याने कार थांबवून ते कारबाहेर सुरक्षित आले.

उरण तालुक्यातील बोरी पाखाडी हुसेन मंजिल येथे राहणारे इकबाल अहेमद कुट्टी, रुबीना इकबाल कुट्टी (पत्नी), नोफ एकबाल कुट्टी (मुलगी), अजीझा इकबाल कुट्टी (मुलगी), उमर इकबाल कुट्टी (मुलगा) हे सर्वजण एका कुटुंबातील सदस्य २१ मे रोजी रात्री प्रवास सुरु केला. त्यांनी रत्नागिरी गोवा-मंगलोर असे फिरता प्रवास केला होता.

२३ मे २०२५ रोजी मारुती एटिंगा कारने प्रवास करत असताना कासरगोड चरकाला या ठिकाणी पहाटे साडेपाच वाजता कारमधून अचानक धूर येऊ लागला. तेव्हा रुबीना इकबाल कुट्टी या कार चालवत होत्या. धूर येऊ लागल्याने रुबीना इकबाल कुट्टी यांनी कार अचानक बाजूला पार्किंग केली.

कारमधून अचानक सर्वजण बाहेर पडले. सुरक्षित ठिकाणी एका बाजूला सर्वजण उभे राहिले. यामुळे सर्वांचे प्राण वाचले. या घटनेत कारला आग लागून कारचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. गाडीला आग लागल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे सदर घटने बाबत इकबाल अहमद कुट्टी व त्यांच्या परिवाराने कासारगोडे जिल्ह्यातील विद्यानगर येथील पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदवून घेतला आहे. सदर वाहनाला आग लागल्याची घटना कशामुळे घडली? आग कशी लागली याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT