Roha bus stand encroachment Pudhari
रायगड

Roha bus stand encroachment: रोहा एसटी आगारात दुकानधारकांचे अतिक्रमण

काहींनी घेतले फुटपाथ ताब्यात, प्रवाशांना चालण्यास आडथाळे

पुढारी वृत्तसेवा

महादेव सरसंबे

रोहे: रोहा बस स्थानकात असलेल्या दुकानधारकांनी बस स्थानकातील परिसरावर अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात वावरताना अडचणी निर्माण होत आहेत. खा. सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून कोकणातील पहिले खाजगीकरणातून बांधलेले रोहा बस स्थानक सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे.

या बस स्थानकात व्यापारी गाळे असून या काळात व्यापाऱ्याने अनेक व्यवसाय थाटले आहेत परंतु यातील काही व्यापाऱ्यांनी रोहा कोलाड मार्गाच्या दिशेकडे असलेल्या आपल्या दुकानासमोर फुटपाथ मोठा केला आहे.

यावर बिनधास्तपणे आपले सामान ठेवत असून यासाठी त्यांनी बांधकाम करून ती जागा मोठी केली आहे. काही दुकानधारकांनी रोहा कोलाड मार्गावरील गटार सुद्धा आपला ताब्यात घेतल्याचे दिसून येते.

अशीच काहीशी परिस्थिती बस स्थानकाच्या आवारात दिसून येत आहे एका खाद्यपदार्थाच्या दुकानधारकाने वडे, भजी करण्याचे स्टॉल चक्क प्रवासी ये जा करण्याच्या मार्गावर बाहेर काढून नेहमीच व्यवसाय करत आहेत.

हा प्रचंड धोकादायक बाब असून यावर कोणाचेही लक्ष का जात नाही हा मोठा प्रश्न समोर येत आहे. या ठिकाणी पदार्थ तळत असताना गरम तेलाचे थेंब प्रवासाच्या अंगार उडत असल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे याच दुकानाच्या समोर चहाची टपरी टाकल्याचे दिसून येते.

या ठिकाणी तयार होणारे खराब दुग्धजन्य पदार्थ कुठे टाकला जातो हा प्रश्न समोर आहेच. परंतु या लगत असलेल्या गटातून अनेकदा दुर्गंधीचा वास येत असल्याचे दिसून येते. गटारावर या व्यापाऱ्याने बांधकाम केल्याने नगरपालिकेला हे गटार साफ करताना अनेक अडचणी येतात.

या दुकानदारकांना कोणाचे अभय आहे असा सवाल ही विचारला जात आहे महत्त्वाचे म्हणजे रोहा एसटी आगर व रोहा नगरपालिका या व्यापारवर कारवाई करणार का असा सवाल विचारला जात आहे.

खासगी वाहनांचेही पार्किंग वाढले

रोहा बस स्थानक च्या आवारात बस बाहेर येत असलेल्या ठिकाणी अनेकदा खाजगी चार चाकी वाहने उभी राहत असल्याचे दिसून येते. बस बाहेर काढताना अनेक वेळा चालकाला कसरत करावी लागत आहे. अनेकदा खाजगी चार चाकी व बस चालकांमध्ये वादावादी होता दिसत आहे.

स्वच्छ रहा सुंदर व्हा अशी संकल्पना रोहा नगर परिषदेच्यावतीने राबवण्यात येत असताना हे गाळेधारक मात्र काही वेळा कचरा रस्त्यावर टाकताना दिसत आहेत. रोहा बस स्थानकातील काही परिसर गाळेधारकांनी वापर करत असल्याने प्रवाशांना मात्र चालताना अडचणी निर्माण होताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT