Eknath Shinde Pudhari
रायगड

Eknath Shinde Raigad Visit| रायगड पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच: उपमुख्यमंत्री शिंदे

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी शिंदे आज रायगडावर आले होते.

पुढारी वृत्तसेवा

इलियास ढोकले

नाते: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मी इथे आलो होतो. अतिशय सुंदर सोहळा पार पडला. छत्रपतींच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी सुरळीत होतील लवकरच पालकमंत्री पदाचा निर्णय देखील होईल आणि तुम्हाला त्याची बातमी मिळेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले रायगडावर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी शिंदे आज रायगडावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

विमानापेक्षा ईमान महत्वाचे असून, कपटी मित्र किती घातक असतो हे देवेंद्र फडणवीस यांना २०१९ साली चांगलेच कळले आहे. त्यामुळे असे प्रयत्न करून काहीही साध्य होणार नाही अशी प्रतिक्रियाही शिंदे यांनी दिली.

२०१९ साली शिवसेना आणि भाजप या दोघांनाही एकाच विमानातून प्रवास करण्याचे तिकीट जनतेने दिलेले होते. मात्र त्यावेळी ऐनवेळी उद्धव यांनी स्वार्थासाठी विमान बदलून काँग्रेस सोबतचे विमान धरत जनमताशी बेइमानी केली.

त्यामुळेच आज ते गटांगळ्या खात सुटलेत, त्यामुळेच आता त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस हे फार हुशार आहेत, त्यांना २०१९ साली कपटी मित्र किती घातक असतो ते पाहिलेले आहे, त्यामुळे मला याबाबत अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT