Ganesh Idol Pudhari
रायगड

Eco Friendly Ganpati: पनवेलमध्ये शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींना वाढती पसंती

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे नागरिकांचा वाढता कल

पुढारी वृत्तसेवा

खांदा कॉलनी: श्री गणेशोत्सवाच्या आगमनाचे वेध गणेशभक्तांना लागले असून, यंदा कोणत्या स्वरूपाची गणेशमूर्ती घ्यायची, याचा विचार नागरिकांकडून सुरू आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे.

प्रशासनाकडूनही नागरिकांना शाडूच्या मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्तींची स्थापना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ‘शाडूचा गणपती आणा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली जात आहे.

पनवेल परिसरातील बाजारपेठांमध्ये विविध आकारांच्या आणि आकर्षक स्वरूपातील शाडूच्या मातीच्या श्री गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्या आहेत. पारंपरिक स्वरूपासह विविध आकर्षक रूपांतील बाप्पाच्या मूर्ती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT