Ganpati Special Trains: कोकणासाठी ३४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या

मध्य रेल्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव दरम्यान चार तर पनवेल-चिपळूण दरम्यान ३० अनारक्षित मेमू
Ganpati Special Trains
Ganpati Special Trainspudhari photo
Published on
Updated on

रोहे: प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वे कोकणासाठी ३४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान ४ आरक्षित विशेष गाड्या तसेच पनवेल आणि चिपळूण दरम्यान ३० अनारक्षित मेमू सेवा चालविण्यात येणार आहे. याचा फायदा कोकणातील गणेश भक्तांना होणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाड्यामध्ये गाडी क्रमांक ०१००३ विशेष गाडी १६ सप्टेंबर आणि १९ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ७.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २३.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. (२ सेवा) गाडी क्रमांक ०१००४ विशेष गाडी १५ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर रोजी मडगाव येथून सायंकाळी १६ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

Ganpati Special Trains
Land Fragmentation Act: तुकड्यातील जमिनींचे व्यवहार होणार नियमित; लाखो जमीनधारकांना मोठा दिलासा

या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी हे थांबे देण्यात आले आहेत.

पनवेल चिपळूण पनवेल मेमू अनारक्षित विशेष गाड्या (३० सेवा) गाडी क्रमांक ०११५९ मेमू अनारक्षित विशेष गाडी १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत पनवेल येथून दुपारी १५.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२.२० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.

Ganpati Special Trains
JNPA Nhava Sheva Suspicious Container: उरण जेएनपीए पोर्टवर संशयास्पद कंटेनर जप्त

(१५ सेवा) गाडी क्रमांक ०११६० मेमू अनारक्षित विशेष गाडी दिनांक १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत चिपळूण येथून सकाळी ९ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १४.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.

वरील मेमू सेवा १५ सप्टेंबरते १७ सप्टेंबर या कालावधीत चालवल्या जाणार नाहीत. पनवेल ते चिपळूण) या गाडीला पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनि हे थांबे देण्यात आले आहेत.

प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वे कोकणासाठी ३४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान ४ आरक्षित विशेष गाड्या तसेच पनवेल आणि चिपळूण दरम्यान ३० अनारक्षित मेमू सेवा चालविण्यात येणार आहे.

अनारक्षित डब्यांचे बुकिंग युटीएस प्रणालीद्वारे

गाडी क्रमांक ०१००३ साठीचे आरक्षण ८ सप्टेंबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांचे बुकिंग युटीएस प्रणालीद्वारे करता येईल. प्रवासी तिकीट बुकिंगसाठी 'रेलवन' ॲप देखील डाउनलोड करू शकतात. या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी, www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीइएस ॲप डाउनलोड करा असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news