संतोष उतेकर
सुधागड: पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून एक जून पासून दोन महिने मासेमारी बंद असते. पावसाळ्यातील बेगमासाठी सुखी मासळी हक्काचा जिनस आहे. त्यामुळेच या दिवसांत सुखी मासळी खरेदी व साठवण करण्यासाठी अनेक जणांची लगबग सुरू आहे. त्यातच सध्या मासळीचे भाव स्थिर असून परिणामी खवय्ये सुखी मासळी खरेदीसाठी घाई करत आहेत.
जिल्ह्यातील आठवडा बाजार व मासळी बाजारात सुखी मासळी खरेदीसाठी वेळ वेळ सुरू आहे. प्रतिकूल वातावरण व अवकाळी पावसामुळे मागील वर्षभरात कमी प्रमाणात मासळी सापडत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात मासळी सापडल्याने सुकविणाऱ्यांवर थर दिला आहे. पावसाळ्यात खाण्यासाठी सुखी मासळी साठवून ठेवली जात असल्याने जिल्ह्यात चांगल्या दर्जाची मासळी असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.
पेडली सुक्या मासळीचे हब
पाली-खोपोली राज्य महामार्गावर पेडली शिवे येथे मोठ्या प्रमाणात मासळी विक्रेते आहेत. मुंबई-पुणे येथून येणाऱ्या पर्यटकांकडून येथे मोठ्या प्रमाणात मासळी खरेदी केली जाते. त्यामुळे व्यापारांना फायदा होत आहे, मागील हंगामाच्या तुलनेत आता सुख्या माजलीचे भाव स्थिर भाव स्थिर मासळी आर्थिक खरेदी केळी जात आहे. ग्राहकांना उत्तम दर्जाची सुखी मासळी योग्य भावात पुरवतो.
भाव प्रतिकिलो
साधे सोडे बाराशे ते सोळाशे
उच्च दर्जाचे सोडे 18 00 ते 2000
भांगडा 20 व 25 रुपये नग अंबाडी दर्जानुसार 5 00, 600 व 700 रुपये
सुकट दर्जानुसार साधी 200 सांगली 300 व साडेतीनशे रुपये
बोंबील पाचशे रुपये खाडीचे बोंबील साईज नुसार 600 ते 800 रुपये
माकुळ आता 700 ते 800 रुपये पांढरी मोठी वाकटी 6 00 ते 700 रुपये
छोटी वाटी 4 00 रुपये मांदळी आता दोनशे रुपये मासे सुकट दाढी सुकट साथ हे 4 00 उत्तम पाचशे रु. रेपटी 400 रु. सुरमई छोटी 6 00 मोठी 800 रुपये भूमी 300 रु.