DRI Seizes 10000 kg Firecrackers pudhari
रायगड

DRI Seizes 10000 kg Firecrackers: महसूल गुप्तचर संचालनालयाची जेएनपीए बंदरात मोठी कारवाई; ३ कोटींचे १०,००० किलो फटाके जप्त

बाटल्यांच्या मालामागे दडवून फटाक्यांची अवैध वाहतूक ; टोळीच्या म्होरक्याला अटक DRI seizes 10000 kg firecrackers worth Rs 3 crore at JNPT Port

Anirudha Sankpal

रायगड : पुढारी वृत्तसेवा

गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जेएनपीए बंदरात परदेशातून आलेल्या जहाजावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे तीन कोटी रुपये मूल्य असलेले १०,००० किलो फटाके जप्त करण्यात आले आहेत.

बाटल्या आणि वॉलपेपरच्या आडून अवैध वाहतूक

परदेशातून आलेल्या संबंधित जहाजावरील कंटेनरमध्ये बॉटल्स (बाटल्या) आणि वॉलपेपर असल्याचं घोषित करण्यात आलं होतं. मात्र, या मालाच्या आडून फटाक्यांची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने संशयित कंटेनरची सखोल तपासणी केली.

कंटेनरमध्ये सापडले तब्बल १९,८०० फटाके

तपासणीदरम्यान कंटेनरच्या सुरुवातीच्या केवळ पहिल्या तीन रांगांमध्ये जाहीर केलेला माल (बाटल्या व वॉलपेपर) ठेवण्यात आला होता. त्यामागे संपूर्ण कंटेनर फटाक्यांनी भरलेला आढळला. या कारवाईत १९,८०० फटाके (ज्यांना '२८८ गॅटलिंग' म्हटले जाते) हस्तगत करण्यात आले. याचे एकूण वजन १०,००० किलो असून आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे ३ कोटी रुपये आहे. हा संपूर्ण माल सीमाशुल्क कायदा, १९६२ अन्वये जप्त करण्यात आला आहे.

फटाक्यांच्या आयातीसाठी 'पेसो'ची परवानगी बंधनकारक

परदेशी व्यापार धोरणानुसार भारतामध्ये फटाक्यांची आयात 'प्रतिबंधित' श्रेणीत येते. फटाक्यांच्या वैध आयातीसाठी परराष्ट्र व्यापार महासंचालकांकडून (डीजीएफटी)विशेष परवानगी तसेच स्फोटक नियम, २००८ अंतर्गत 'पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना' (पीईएसआे) यांच्याकडून अधिकृत परवाना घेणे अनिवार्य असते.

टोळीच्या मुख्य म्होरक्याला अटक

या बेकायदेशीर मालाचे गुप्तपणे कस्टम्स क्लिअरन्स मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि या संपूर्ण सिंडिकेटची आखणी करणाऱ्या मुख्य सदस्याला डीआरआयने शोधून काढले असून त्याला सीमाशुल्क कायदा, १९६२ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.व्यावसायिक मालवाहतूक मार्गांचा गैरवापर करून प्रतिबंधित वस्तूंची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी डीआरआय सातत्याने कटिबद्ध असल्याचे या कारवाईवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT