Murud Janjira Tourism Pudhari
रायगड

Murud Janjira Tourism: दिवाळीच्या सलग सुटीत मुरुड जंजिरा फुल्ल होणार

ताज्या मासळीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मुरुडकडे वळणार; हॉटेल्स दिवाळीसाठी सज्ज

पुढारी वृत्तसेवा

मुरुड जंजिरा: दिवाळीला लागून आलेल्या वीकएण्डमुळे पर्यटनप्रेमींना मोठा लाभ झाला असून, अनेक कुटुंबांनी आपला मोर्चा मुरुड जंजिरा वळवणार. श‌निवार आणि रविवार असे दोन्ही दिवस रायगडातील विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी राहणार आहे दिवाळीला लागून आलेल्या वीकएण्डमुळे पर्यटनप्रेमींना मोठा लाभ झाला असून, मुरुड शहरात पाऊस गेल्याने वातावरण अलधदायक व सुंदर आहे .समुद्र शांत असल्याने मासेमारी चांगली होत असल्याने पर्यटकांना मनसोक्त ताजे मासे खाण्याचा आनंद घेता येणार आहे.

मुरुड समुद्रकिनारी असलेली हॉटेल .दिवाळीसाठी सज्ज झालीत .सर्व हॉटेल रंगरंगोटी ,विविध रंगाची रोषणाई ,नवनवीन चविष्ट पदार्णतःचे स्टोल .समुद्रावर घोडसावरी ,मोटार बाईक ,पाणीपुरी ,भेळ पुरी अशा विविध स्टॊल किनारा बहरला आहे

नगरपालिकेने समुद्रकिनारी असलेली विश्राम धाम हि बागेचे नूतनीकरण केल्याने त्याचा लाभ दिवाळीत येणाऱ्या पर्यटकांना होणार .पालिकेचे कर्मचारी समुद्रकिनारी दिवसातून ३ वेळा स्वच्छ करतात ,मुरुडला असणारे जलदुर्ग जंजिरा व पदामदुर्ग पर्यटकांसाठी सज्ज झालेत.

मुरुड पासून जवळच असणारे गारंबी धारण ,कुडे मांदाड लेणी , खोकरी , दत्तमंदिर या पर्यटन स्थळावर स्वछता करून खाण्यापिण्याचे स्टॊल करण्यात आलेत सलग सुट्टे असल्याने पर्यटकांसाठी मुरुड तालुका सज्ज झाला आहे.

गेली २ वर्ष कोरोना मुळे हॉटेल वैवसाय डबघाईला आला होता .ह्या वर्षी दिवाळीला सलग सुटिअसल्याने बुकिंग चांगली आहे .पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात मुरुडला यावे आम्ही त्यांना ऊत्तम सेवा देऊ व हॉटेल भाडे देशील योग्य दारात घेऊ .पर्यटकांनी ४ दिवस राहण्यासाठी यावे असे .मरिना हॉटेल मालक सुहेब मलिक यांनी सांगितले.

दिवाळीच्या सुटीसाठी मुरुड तयार आहे .पिण्याचे पाणी , शहरातील रस्ते ,व समुद्रलकिनार स्वछता ,याकडे जातीने लक्ष दिल्याने पर्यटकांना त्रास होणार नाही असे मुख्यअधकारी मुरुड नगर पालिका सचिन बच्छाव यांनी सांगितले.

पर्यटकांनी समुद्रात जाताना भरती ओहोटी याचे भान ठेऊन समुद्राच्या लाटांचा सुरक्षित आनंद घेण्याचे आव्हान केले आहे .महाराष्ट्राला दुष्काळाचे सावट असल्याने पर्यटकांनी पाणी जपून वापरावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT