Diesel Tanker Overturns Pudhari
रायगड

Diesel Tanker Overturns: महामार्गावरील घोणसे घाटात डिझेलचा टँकर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

कठड्याला धडक; मोठी वित्तहानी

पुढारी वृत्तसेवा

श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा: दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील म्हसळा येथील घोणसे घाटात डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने रविवारी दुपारी वाहतुकीचा खोळंबा झाला. असुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असली तरी महामार्गावर डिझेलची गळती सुरू झाल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती बंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माणगावकडून म्हसळ्याकडे डिझेल वाहतूक करणारा टँकर घोणसे घाटातील तीव्र उताराच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने संरक्षण कठड्यावर जोरदार आदळला व पलटी झाला.

अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात डिझेलची गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संभाव्य आग अथवा अन्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक बंद केली. त्यामुळे घाटमार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

घोणसे घाटातील अपघातग्रस्त ठिकाणी उभारण्यात आलेली मजबूत संरक्षण भिंत असल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा नागरिकांत सुरू होती.अन्यथा टँकर दरीत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान घोणसे घाटात सातत्याने अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा शासनाकडे आंदोलन करून घाटमार्गातील धोकादायक वळणात बदल करण्याची मागणी केली होती.

घाटातील शेवटचे उतार वळण रस्ता विकासकाने चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून गेल्या पाच वर्षांपासून या मार्गात सुधारणा करण्याची मागणी प्रलंबित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT