Gutkha smugglers arrested
रोहा येथे गुटख्याची वाहतूक करणारे अटकेत pudhari photo
रायगड

Crime News | रोहा येथे गुटख्याची वाहतूक करणारे अटकेत, दहा लाखांचा माल पकडला

पुढारी वृत्तसेवा

कोलाड ःरोहा तालुक्यातील ताम्हिणी घाटाकडे जाणार्‍या रस्त्यावरील भिरा फाटा ते विळे येथे पेट्रोलिंग करताना कोलाड पोलिसांनी विमल गुटखा, सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारी कार ताब्यात घेतली. या कारमधील कारचालक आणि दहा लाख 18 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

शनिवारी 20 जुलै रोजी 11.30 वाजता कोलाड पोलीस स्टेशन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते, पोसई नितीन चौधरी, सहा सहा पो उपनिरीक्षक नरेश पाटील, पो.ह. कृष्णा म्हात्रे, पो.शी.डी एन पांचाळ यांचे पथकाने पेट्रोलिंग दरम्यान भिराफाटा ते विले जाणार्‍या रोडवर भिरा फाटा येथे ब्रिझा कार क्रमांक एमएच 12 एम डब्ल्यू 7173 ही मध्ये 10 लाख 18 हजार 320 रुपये किमतीचा विमल गुटखा व विमल पान मसाला कोलाडच्या दिशेने घेऊन येताना अजय उखाराम चौधरी वय 29 मूळ राहणार सोजत तालुका जिल्हा पाली राजस्थान सध्या राहणार खेड शिवापुर पुणे यास पकडले असून त्याचे विरुद्ध कोलाड पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये 10 लाख 18 हजार 320 रुपयाचा ब्रिझा गाडीसह प्रतिबंधित विमल गुटखा व तंबाखू असा माल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक नरेश पाटील यांनी दिलेल्या खबरेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी कोलाड पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदरची धडाकेबाज कामगिरी बाबत कोलाड परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे.

SCROLL FOR NEXT