Panvel | महामुंबई बँकेचा महाघोटाळा उघड, 2 कोटी 12 लाखांचा गैरव्यवहार

जादा परताव्याच्या आमिषाने गंडा
 fraud
महामुंबई बँकेचा महाघोटाळा उघड, 2 कोटी 12 लाखांचा गैरव्यवहारfile photo

पनवेलः गुंतवणूकदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून नंतर त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पनवेल मधील कामोठे येथील महामुंबई अर्बन निधी लिमिटेड बँकेत घडला आहे. याप्रकरणी गुंतवणूकदारांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बँकेच्या संचालक मंडळ व चेअरमन यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे.

या बँकेतील गैरव्यवहाराबाबत पञकार मिञ असोसिएशनने 31 जानेवारीला पोलिस आयुक्तांना पञव्यवहार केला होता. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने तपास केला. पोलिस उपनिरिक्षक नरेंद्र पाटील यांनी अहोराञ मेहनत घेत गुन्हा दाखल करत आपल्या सिंघम कामगिरीने महामुंबई बँकेचा महाघोटाळा उघड केला आहे. सखोल चौकशीत हा घोटाळा अजून विविध प्रकारे उघड होण्याची शक्यता आहे.बँकेत गुंतवणूक केली तर 1 लाख रुपयांमागे वर्षाला 10.5 टक्के तर महिन्याला 8 टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवण्यात आले. जादा व्याजदर मिळेल या आशेने अनेक सर्वसामान्य लोकांनी आपले पैसे महामुंबई बँकेत गुंतवले. माञ गुंतवणूक दारांची दिशाभूल करुन संचालक मंडळाने संबंधितांचे पैसे मिनर्वा ब्रोकींग या स्वत: च्या कंपनीच्या खात्यावर स्विकारले. बँकेत गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा विहित वेळेत न मिळाल्याने आमच्यासह अन्य गुंतवणूकदारांची फसवणूक झाली अशी फिर्याद कामोठे येथील रेणुका विजय कुराडे यांनी कामोठे पोलिस ठाण्यात केली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरिक्षक अजय कांबळे, सहायक पोलिस निरिक्षक प्रशांत तायडे यांनी तपास केला. पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी पुरावे गोळा करत गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रीयेस वेग दिला. गुंतवणूकदार रेणुका कुराडे यांचे 2 कोटी 12 लाख 24 हजार आठशे रुपये तसेच इतर 71 गुंतवणूक दारांच्या रक्कमेचा गैरव्यवहार केला म्हणून महामुंबई अर्बन निधी लिमिटेड कामोठेचे संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूक झालेल्यांनी तक्रार करावी

कोणाचे पैसे अडकल्यास आर्थिक गुन्हे शाखा किंवा कामोठे पोलिसांशी संपर्क साधाकामोठे येथील महामुंबई अर्बन निधी लिमिटेड बँकेत गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणुक केली म्हणून संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे. सदर बँकेत अजूनही कोणाचे पैसे अडकले असतील तर त्यांनी आर्थिक गुप्तवार्ता पथक नवी मुंबई 02227573071, 7700920766 यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news