JNPA Container Congestion Pudhari
रायगड

JNPA Container Congestion: वाढत्या कंटेनरमुळे पुरवठा साखळी विस्कळीत

जेएनपीए बंदरातील साखळी विस्कळीत : उद्योगाला फटका

पुढारी वृत्तसेवा

कोप्रोली उरण: जेएनपीए बंदरात अचानक कंटेनरची गर्दी निर्माण झाल्याने देशभरातून होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या आयात-निर्यातीच्या संपूर्ण पुरवठा साखळीत व्यत्यय येण्यास सुरुवात झाली आहे.

यामध्ये जहाजांसाठी मोठा प्रतीक्षा कालावधीत वाढ होत चालली आहे. यामुळे खिशावर मोठा भार पडत असल्याने निर्यातदारांना आणखी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्सने व्यक्त केली आहे.

कंटेनरच्या साठ्यामुळे जहाजांना धक्क्याला लागण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागत आहे. कंटेनर यार्डमध्ये जागेची कमतरता आणि ट्रक हाताळणीतील विलंबामुळे माल वेळेवर रवाना होण्यास अडथळा येत आहे. या विलंबामुळे निर्यातदारांवर अतिरिक्त लॉजिस्टिक्स खर्च, कंटेनर डिटेंशन आणि डेमरेज शुल्क (विलंब शुल्क) या स्वरूपात मोठा आर्थिक भार पडत आहे.

विदेशी खरेदीदारांना वेळेवर माल पोहोचवण्यात येणारी असमर्थता हे सर्वात मोठे आव्हान आहे, ज्यामुळे व्यापारी संबंधांवर ताण येण्याचा धोका वाढला आहे. विदेशात पाठवण्यासाठी जेएनपीए बंदरावर अवलंबून आहेत.

या गर्दीचा राज्यातील कानपूर येथील चामड्याचा आणि घोड्यांच्या सामानाचा (सॅडलरी) उद्योग, नोएडातील तयार कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू,मोरादाबाद येथील पितळेच्या वस्तू आणि हस्तकला,भदोही आणि वाराणसी येथील गालिचे, हातमाग आणि वस्त्रोद्योग,आग्रा आणि अलीगढ येथील पादत्राणे, हार्डवेअर आणि कुलूप उद्योगांवर थेट परिणाम झाला असल्याचे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्सचे सहायक संचालक आलोक श्रीवास्तव यांनी माहिती देताना सांगितले.

निर्यातदारांसाठी आगाऊ नियोजन

सध्याचे संकट लक्षात घेता, एफआयईओने सर्वच निर्यातदारांना त्यांच्या मालाच्या पाठवणीचे आगाऊ नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निर्यातदारांना त्यांचे कस्टम हाऊस एजंट (सी एच ए), फ्रेट फॉरवर्डर्स आणि शिपिंग कंपन्या यांच्याशी सतत संपर्कात राहण्यास सांगितले आहे.

या­व्यतिरिक्त, व्यापार सौदे धोक्यात येऊ नयेत यासाठी मालाच्या पाठवणीतील कोणत्याही विलंबाबद्दल परदेशी खरेदीदारांना वेळेवर माहिती दिली पाहिजे अशाही निर्यातदारांना आगाऊ नियोजनाच्या सुचनाही दिल्या असल्याचे सहायक संचालक आलोक श्रीवास्तव यांनी सांगितले.

मध्यपूर्वेतील देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि अतिवृष्टी, वादळ आणि खराब हवामानामुळे काही तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा जहाजांना बंदरात ये-जा करण्यासाठी विलंब होतो. या अडचणींमुळे खबरदारी म्हणून अधुनमधून जहाजांनाही बंदरात कार्गो चढउतार करण्यास मनाई केली जाते.यामागे आयात- निर्यातदार व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही याचीही दक्षता घेतली जाते. यादरम्यान काही वेळा बंदरात कंटेनरची संख्या वाढते.मात्र कंटेनर मालाची वाहतूक पुर्ववत सुरू करण्याच्या कामाला बंदर प्रशासनाकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.
- रविशकुमार सिंह, जेएनपीए-उपाध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT