हवामानात होणारे बदल यामुळे नारळाचे उत्पादन कमी प्रमाणात आले आहे.  Pudhari News Network
रायगड

Coconut Prices: ऐन सणासुदीत नारळाच्या किमती वाढल्या; दर पोहोचले 50 ते 60 रुपयांपर्यंत, कारण काय?

ऐन सणासुदीला दरही वाढले,उत्पादक शेतकरीही चिंताग्रस्त

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग (रायगड) : श्रीफळ अर्थानं नारळ हा बारामही लागणारे फळ आहे. विशेषतः कोकणात आणि केरळ मध्ये जास्त वापर करतात. सणासुदीचा दिवस सुरु झाल्याने नारळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र सातत्याने हवामानात होणारे बदल यामुळे नारळाचे उत्पादन कमी प्रमाणात आले आहे. याचच परिणाम म्हणजे नारळाच्या किमती वाढल्या आहेत. सध्या 50 ते 60 रुपये इतक्या किमतीने विकला जात आहे.

आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरवात होते. नागपंचमीपासून सणाला सुरवात होते ते दिवाळी पर्यंत. यावेळी नारळाला मागणी खूप असते. कल्पवृक्ष म्हणू ओळख असणार्‍या नारळाच्या उत्पादनाकडे बागाईतदार वळले आहेत. चांगला भाव येत असल्याने गेल्या 4 ते 5 वर्षांपासून उत्पन्न घेत असल्याचे नागाव येथील मुग्धा जोशी ह्यांनी सांगितले. अवेळी पडणारा पाऊस आणि वन्यप्राणांचा त्रास यामुळे गेले वर्षभर केवळ 40 टक्केच उत्पन्न मिळत असल्याचे जोशी ह्यांनी सांगितले. वर्षभर देखभाल करणे साफसफाई औषधे आणि खत यावर होणार खर्च हि निघत नाही त्यामुळे नारळ उत्पन्न घेणार्‍या वर आर्थिक संकट आले आहे.

नारळावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरु झाल्याने बाजारातील आवक कमी झाली आहे. विशेषतः व्हर्जिन ऑइल मुळे नारळाची विक्री थेट तिकडं होते त्यामुळे बाजारात येणारे नारळ हे चढ्या भावाने विकले जातात, कोरोना नंतर आरोग्यावर तसेच खाद्यपदार्थांवर नागरिकांनी जास्त लक्ष दिले आहे. त्यामुळे व्हर्जिन ऑइल ची मागणी वाढली आहे.

नारळाचे उत्पादन जरी कमी झाले असले तरी मागणी मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तितके उत्पन्न न आल्यामुळे पुरवठा करणे शक्य होत नाही. सध्या नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. लहान नारळ रु 30 ते 40 आणि मोठे नारळ रु 50 ते 60 ने ऐकले जात आहेत.
मुग्धा जोशी , बागाईतदार नागाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT