खाडीपट्टा : तीव्र उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने त्याचा जनजीवनावर देखील परिणाम होत असून त्याचबरोबर उन्हाच्या ताडाख्यामुळे पशु पक्षीही कासावीस झाले आहेत. खाडीपट्टयात रस्त्याबाजूला एखाद्या झाडाखाली, पेंढा डाळलेल्या माचाखाली निवारा गाठताना पशु पाहायला मिळत आहेत. रखरखत्या उन्हाची कडक तापी वाढू लागल्याने त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम होत असल्याचे जाणवू लागल्याचे पाहायला मिळत आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा वाढला असून सद्यस्थितीला पारा 39 च्या आसपास जात आहे. सकाळ पासून सायंकाळ पर्यंत उष्णतेचे चटके सहन करावे लागत आहेत. मानवासह इतरही जीवसृष्टी वाढत्या तापमानवाढीमुळे चांगलीच हैराण झालेली असल्याचे एकंदर परिस्थितीवरून दिसून येत आहे.
वाढलेल्या तापमानापासून बचाव करण्यासाठी एसी कुलर चा मोठया प्रमाणात वाढला असुन मात्र पशुधनाला मात्र झाडांचा निवारा घ्यावा लागत आहे.मागील कित्येक वर्षांच्या मानाने यंदा मात्र सर्वत्र तापमानात मोठीच वाढ झाल्याने सर्वांनाच या वाढत्या तापमानाचा सामना करावा लागत आहे. तीव्र वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी दुपारच्या वेळेस घराबाहेर न पडणेच शहाणपणाचे ठरत आहे.
दररोज शीतपेयांचे सेवन करणे, एसी-कुलरचा वापर करणे, आहारात थंडावा निर्माण करणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे, फळांचा आहार घेणे, सुती कपडे वापरणे, उन्हात फिरताना टोपी व गॉगलचा वापर करणे आदी बाबींवर प्रत्येकाकडून भर दिला जात असल्याचे पाहायला मिळत आहे, तर पशु, पक्षीही दुपारच्या तीव्र वातावरणात झाडांच्या सावलीचा आधार घेत असल्याचे खाडीपट्टयात फेरफटका मारला असता पाहायला मिळाले.
पारा 39 अशांच्या घरात
दरम्यान, गेली दोन दिवसांपासून पहाटे थंडी पडत असून मात्र सकाळी 10 वाजल्यापासून उन्हाच्या तीव्र ज्वाला सुर्य सोडत आहे. दररोज पडणाऱ्या तीव्र उष्णतेशी सामना प्रत्येकाला करावा लागत आहे. सद्यस्थितीला खाडीपट्टयात 39 च्या आसपास तापमान पोहचत असल्याचे पाहायला मिळत आहे. तापमानाचा त्रास मोठा जाणवत आहे. अशा परिस्थितीत उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून प्रखर उन्हात फिरू नये, जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे, शिळेपाके अन्न खाऊ नये, पुरेशी झोप घेणे, थकवा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आदी नियमांचे पालन प्रत्येकाने करावे असा सल्ला डॉक्टरांकडून सांगितला जात आहे.